Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Terrace Gardening : आता टेरेसवर आंबा, पेरू आणि लिंबाची लागवड करून मिळवू शकता, भरपूर उत्पादन

Terrace Gardening

Terrace Gardening : वाढत्या महागाईमध्ये सध्या भाज्यांचे दर वाढल्याची बातमी सतत कानावर येत आहे. भाज्यांच्या महागाईतून सुटका करण्यासाठी तुम्ही टेरेस गार्डनिंगची कल्पना अमलात आणू शकता. जाणून घ्या, कशी लागवड करायची?

Terrace Gardening : शहरांमध्ये टेरेस गार्डनचा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. लोक आपल्या घराच्या छतावर आणि बाल्कनीमध्ये फुलांसह हिरव्या भाज्यांची लागवड करत आहे. लहानांपासून मोठ्या शहरांपर्यंत तुम्हाला असे अनेक लोक आढळतील जे छतावर वांगी, टोमॅटो, लसूण, भेंडी, हिरवी मिरची, शिमला मिरची, हिरवी धणे आणि कांदा पिकवतात. हे लोक रोजच्या गरजेच्या हिरव्या भाज्या टेरेस गार्डनमधूनच तोडतात.

पण, आता काहींनी छतावर हिरव्या भाज्यांसह फळांची लागवड सुरू केली आहे. टेरेसवर लिंबू, संत्रा, सफरचंद, पेरू या फळांची लागवड केली जात आहे. त्याचबरोबर अनेकजण सुक्या मेव्याचीही लागवड करत आहेत. जर तुम्हालाही टेरेसवर आंबा, पेरू, लिंबू, संत्रा आणि केळीची लागवड करायची असेल तर त्यांची संकरित रोपे फक्त कुंडीत लावा. कारण देशी आंबा आणि पेरूची झाडे खूप वाढतात. अशा परिस्थितीत त्यांची मुळे जमिनीत खूप खोलवर पसरतात. त्यामुळे कुंड्यांमध्ये देशी जातीच्या फळांची लागवड करणे शक्य होत नाही.

रासायनिक खतांचा कधीही वापर करू नका

छतावर आंबा, केळी, पपई, पेरू, लिंबू यांची लागवड सुरू करण्यापूर्वी कुंडीत चुकूनही रासायनिक खतांचा वापर करू नका. शेणखत नेहमी भांड्यात मिसळून मातीत टाकावे. त्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते आणि फळेही लवकर येऊ लागतात. याशिवाय भाज्यांची सालं कुजवून भांड्यात टाकू शकता. हे सेंद्रिय खत म्हणूनही काम करते.

झाडांची काळजी कशी घ्याल? 

तज्ज्ञांच्या मते, छतावर कायमस्वरूपी शेती करण्यासाठी खांबांच्या साहाय्याने आरसीसीचे 2 फूट उंच बेड तयार करा. नंतर त्यात माती भरून शेण टाकावे. यानंतर तुम्ही कोणत्याही भाज्या आणि फळांची चांगली लागवड करू शकता. यासह सिंचन केल्यास घरांमधील ओलसरपणाची समस्या दूर होईल. यासोबतच झाडांना पोषक तत्वेही पुरेशा प्रमाणात मिळू शकतील. अनेक राज्यांमध्ये सरकार छतावर फळे आणि भाजीपाला पिकवणाऱ्यांना सबसिडी देखील देते. विशेषत: बिहारमधील अनेक शहरांमध्ये लोकांना छतावर शेती करण्यास प्रोत्साहित केले जाते.

भाज्यांच्या महागाईतून सुटका

सध्या भाज्यांचे दर खूप वाढले आहे. नेहमी कोणत्या न कोणत्या भाजीचे दर वाढलेले असते. मग यातून सुटका करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी भाज्यांची लागवड करू शकता. त्यातून तुम्हाला घरी वापरण्यासाठी ताजा भाजीपाला मिळेल आणि तुमची बचत सुद्धा होईल. त्याचबरोबर उत्पादन जास्त असल्यास तुम्ही छोटा व्यवसाय देखील स्थापन करू शकता. त्यातूनही तुम्हाला भरघोस नफा मिळेल. 

Source : www.tv9hindi.com