आता तुम्ही थेट पेटीएम वरून IRCTC ट्रेन तिकीट बुकिंग करू शकता. होय, आता लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटासाठी रेल्वे स्टेशनवरील रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुमच्या पेटीएम मोबाईल ॲपवरून तुम्ही रेल्वे तिकीट बुक करू शकणार आहात.
पेटीएम वर ऑनलाइन रेल्वे आरक्षण आता सोपे, जलद आणि सुरक्षित झाल्यामुळे तुम्हाला घरबसल्या IRCTC तिकीट बुकिंग करता येणार आहे. याबाबत पेटीएम आणि भारतीय रेल्वे प्राधिकरण यांच्यात एक करार झाला आहे. तुम्हांला माहिती असेलच की, भारतीय रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट हे IRCTC म्हणजेच Indian Railway Catering and Tourism Corporation च्या माध्यमातूनच बुक करता येते. आतासुद्धा तुम्हांला IRCTC च्या माध्यमातूनच तिकीट बुक करायचे आहे, मात्र पैसे तुम्ही Paytm द्वारे भरू शकता. चला तर जाणून घेऊयात काय आहे प्रोसेस…
पेटीएम वर रेल्वे बुकिंग
तुम्ही तुमचे पेटीएम खात्याचे क्रेडेंशियल वापरून पेटीएममध्ये लॉग इन करू शकता आणि ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी दिलेल्या दिलेल्या स्टेप्सचे पालन करू शकता.
- https://tickets.paytm.com/trains ला भेट द्या
- कोणत्या शहरातून कोणत्या शहरात प्रवास करायचा आहे ते लिहा
- कोणत्या दिवशी प्रवास करायचा आहे ते लिहा, त्यांनतर तुम्हांला स्कीनवर उपलब्ध ट्रेनची लिस्ट दिसेल
- तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि त्यासाठी सीटची उपलब्धता तपासा
- तुमच्यासाठी योग्य असलेली सीट, क्लास आणि तारीख निवडा.
- "Book" बटणावर क्लिक करा आणि तुमचा IRCTC लॉगिन आयडी टाका.
- प्रवाशाचे नाव, वय, पत्ता आदी माहिती विचारली जाईल ती भरा आणि "Book" बटणावर क्लिक करा
- आता पेमेंटसाठी पुढे जा, तुमच्या पसंतीची पद्धत निवडा म्हणजे डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेटीएम वॉलेट.
- पासवर्ड टाकण्यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल.
- तुमचा IRCTC पासवर्ड टाका. त्यांनतर तुमचे तिकीट बुक होईल.
डिजिटल तिकीट
एकदा की तुम्ही तुमचे पेमेंट केले की, तुम्हांला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि इमेल आयडीवर तिकिटाचे तपशील पाठवले जातील. ही डिजिटल कॉपी दाखवून तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता.
याशिवाय ट्रेनची सद्य स्थिती देखील पेटीएम वर ग्राहकांना बघता येणार आहे. तिकीट बुकिंगसाठी ग्राहकांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही असे पेटीएमने म्हटले आहे.