Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2: जाणून घ्या, बिझनेसमॅन पीयुष बन्सल कसे बनले सेलिब्रिटी?

Businessman to Celebrity Journey of Peyush Bansal

Peyush Bansal Interview: शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सीझनमुळे या कार्यक्रमातील जज (परिक्षक) खूप लोकप्रिय झाले. त्यांचा चाहता वर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र यातील परिक्षक लेन्सकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल यांना हे सेलिब्रिटी फेम आवडत नसल्याचे, त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले. चला, पाहूयात उद्योजक पीयुष बन्सल यांचे विचार.

Shark Tank India 2: शार्क टॅंक इंडिया 2 सुरू होण्यास अगदी दोनच दिवस शिल्लक आहे. या शो ची रोज ना रोज काहीना काही चर्चा रंगत असते. या शो ची चर्चा जितकी, परिक्षकांची चर्चा ही तितकीच असते. पाहता, पाहता देशातील यशस्वी उद्योजक शार्क टॅंक इंडिया या शो मुळे इतके प्रसिद्ध झाले की, त्यांना सेलेब्रिटी इतके महत्व प्राप्त झाले आहे. हा सेलिब्रिटी फील मात्र उदयोजक लेन्सकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल यांना आवडत नाही. त्यांना सर्वसामान्यांसारखे राहणे आवडत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. जाणून घेऊया, त्यांच्या या मुलाखतीबद्दल

 मला सर्वसामान्यांसारखे राहणे आवडते

लेंसकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल (Lenskart CEO Peyush Bansal) हे एका मुलाखतीत सांगतात की, मला फॅन फॉलोइंग आवडत नाही. मला सर्वसामान्यांसारखे जीवन जगायला आवडते. फॅन फॉलोइंगमुळे एका प्रकारची भिती निर्माण होते. फक्त कारण असू शकते, मी या शो मध्ये न येण्याचे, ते म्हणजे सर्वाधिक फॅन फॉलोइंग. मी लहानपणापासून ऐकत आलो आहे की, फक्त लाइमलाइट आयुष्य हे जास्त दिवस नसते. मला हे आयुष्य पाहिजे ही नाही. मला एक नॉर्मल जीवन जगण्यास आवडते.  

बिझनेसमॅन बनला सेलिब्रिटी

बिसनेसमॅन पीयुष बन्सल आपला सेलेब्रिटी बनण्याचा किस्सा मुलाखतीत सांगितला. ते म्हणतात की, जेव्हा शो सुरू झाला, तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट आली होती, त्यावेळी मी घरी होतो. कोरोनामुळे मी प्रमोशनसाठी कपिल शर्मा शो मध्ये जाणे देखील टाळले. मी एक ते दीड महिन्यांनंतर घराबाहेर पडलो. त्यावेळी मी मॉलमध्ये पोहोचलो. काही लोकांनी मला नोटिस केले. लोक माझ्यासोबत बोलायला आले.  एकदा तर मी एयरपोर्टवर होतो. ते ही मी डबल मास्क लावला होता. शील्ड कॅपदेखील होती. मी काउंटरवर गेलो व माझा बोर्डिंग पास मागितला. तिथेच काउंटरजवळ एक मुलगी उभी होती. तिने मला विचारले की, तुम्ही पीयुष बन्सल आहात का? जेव्हा मी तिला विचारले, तु मला कसे ओळखले? तर तिने मला सांगितले फक्त तुमच्या आवाजावरून, मी तुम्हाला ओळखले. हे माझ्यासाठी खूप क्रेझी होते. त्यावेळीच मी ओळखले आपण आता बिझनेमॅनसोबतच एक सेलेब्रिटी झालो आहोत.