Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Police Gallantry Awardees: पोलिसांना रेल्वेतून मोफत प्रवास नाहीच, रेल्वे खात्याने दिलं 'हे' कारण...

Police Gallantry Awardees

पदक विजेत्या पोलिसांना रेल्वेतून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी गृह मंत्रालयाने रेल्वे विभागाला केली होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने ही मागणी फेटाळली आहे. राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांना मोफत प्रवास करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

Police Gallantry Awardees: पदक विजेत्या पोलिसांना रेल्वेतून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी गृह मंत्रालयाने रेल्वे विभागाला केली होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने ही मागणी फेटाळली आहे. राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांना मोफत प्रवास करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा मोफत देण्याची मागणी फेटाळून लावली. सेंट्रल रिझर्व्ह फोर्स (CRPF) द्वारे हा प्रस्तार सर्वात आधी तयार करण्यात आला होता.

आर्थिक कारण देत रेल्वेने नाकारला प्रस्ताव( Railway ministry rejects proposal due to economic reasons)

प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री(PPMG) आणि मेडल फॉर गॅलेंट्री Medal for Gallantry (PMG) हे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेल्या विविध पोलीस दलातील पदकविजेत्यांना शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमधून मोफत प्रवास मिळावा यासाठी गृहमंत्रालयाने प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आर्थिक आणि इतर कारणे देऊन रेल्वे मंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. याआधी PMG आणि PPMG पोलीस पदक मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना एक्झिक्युटिव्ह क्लासमधून वर्षातून एकदा मोफत प्रवास करता येत होता.

सीआरपीएफ खात्याने तयार केला होता प्रस्ताव (CRPF dept had Created proposal)

केंद्रीय राखीव पोलीस दलाने केलेल्या शिफारसीनुसार गृह मंत्रालयाने रेल्वे विभागाकडे अहवाल पाठवला होता. मोफत प्रवासाची सुविधा राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये PMG/PPMG पदक मिळालेल्या पोलिसांना देण्यात यावी, असे या अहवालात म्हटले होते. मात्र, रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी ही सुविधा देण्यास नकार दिला, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. सीआरपीएफच्या संचालकांनी यासंबंधी अहवाल तयार केला होता. हा अहवालानंतर गृहमंत्रालयाद्वारे रेल्वे खात्याकडे विचारार्थ पाठवण्यात आला होता.

PPMG आणि PMG पदक विजेत्यांना आणि पोलीस पदक विजेत्यांच्या विधवा पत्नींना राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून प्रवास करण्यास परवानगी दिली जात होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा नंतर काढून घेतली, असे पोलीस खात्यातील सुत्रांनी म्हटले आहे. रेल्वे खात्याने ही सेवा आर्थिक कारण देत पुन्हा सुरू करण्यास नकार दिला आहे.