तुम्हाला तुमचे युपीआय खाते बनवायचे असेल, तसेच तुमच्याकडे डेबिट किंवा एटीएम कार्ड नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आता ही अडचण खूप सोपी झाली आहे. एटीएम कार्ड नसतानाही तुम्ही युपीआय खाते तयार करू शकता. (UPI Registration) आता हे काम आधार कार्डद्वारे करता येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) याबाबत माहिती दिली आहे.
पीएनबी बँकेने केली घोषणा
अलीकडेच पंजाब नॅशनल बँक (PNB – Punjab National Bank) ने जाहीर केले आहे की त्यांचे ग्राहक आधार-आधारित वन-टाइम पासवर्ड (OTP) प्रमाणीकरण वापरून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) साठी नोंदणी करू शकतात. यापूर्वी, युपीआय तयार करण्यासाठी, ग्राहकांना नोंदणी करताना पिन सेट करण्यासाठी ओटीपी प्रमाणीकरणासाठी वैध डेबिट कार्ड क्रमांक अनिवार्यपणे वापरावा लागत होता. ही प्रक्रिया अनेक बँक खातेधारकांसाठी मर्यादित होती, परंतु आता ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाहीत. तेही उपयोग करु शकतात.
पीएनबीने ट्विट जारी केले
पीएनबी बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. पीएनबी बँकेने सांगितले की, तुम्हाला माहिती आहे का? युपीआयसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी भेट द्या: https://bit.ly/3V9NOw3.”
स्वत: युपीआय सेट करा
एनपीसीआय (NPCI) वेबसाइटनुसार, "आधार OTP ची सुरुवात युपीआय सेट/रीसेट करण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे आणि ज्या ग्राहकांकडे डेबिट कार्ड नाही त्यांच्यासाठी ही एक सोय आहे. ते पेमेंट करण्यासाठी युपीआय प्लॅटफॉर्म वापरू शकतात."
- आधार वापरून तुमचा युपीआय पिन सेट करा
- युपीआय अॅपवर नवीन युपीआय पिन सेट करा
- त्यासाठी तुम्ही आधार आधारित पडताळणी निवडा
- तुम्ही आधार कार्डचे शेवटचे 6 अंक टाइप करून प्रमाणीकरण करू शकता
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा
- नंतर स्वीकार करा आणि संमती द्या
- बँकेचे पडताळणीनंतर, तुम्ही नवीन युपीआय पिन टाकून कन्फर्म करू शकता