Stock Market Holidays 2023: 2023 या वर्षात शेअर मार्केट 15 दिवस बंद असणार आहे. त्यातील 4 सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी आल्या आहेत. तर 15 सुट्ट्या सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान आल्या आहेत. जानेवारी महिन्यात फक्त एकच दिवस सुट्टी आहे; तर मार्च महिन्यात 2 दिवस मार्केट बंद असणार आहे. मार्केट सर्वाधिक एप्रिल महिन्यामध्ये बंद असणार आहे. कारण या महिन्यात सणासुदीच्या बऱ्याच सुट्ट्या आहेत. 2022 मध्ये एकूण 13 दिवस शेअर मार्केटला सुट्टी होती.
शेअर मार्केटचे कामाचे दिवस आणि वेळ काय आहे?
इंडियन शेअर मार्केटमधील बॉम्बे शेअर मार्केट (BSE) आणि नॅशनल शेअर मार्केट (NSE) हे सकाळी 9.15 वाजता ओपन होतात आणि दुपारी 3.30 वाजता बंद होतात. सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस बीएसई आणि एनएसईमध्ये कामकाज चालते. तसेच शनिवार आणि रविवारी मार्केट बंद असते.
2023 मध्ये शनिवारी व रविवारी आलेल्या सुट्ट्या
18 फ्रेब्रुवारी - शनिवार - महाशिवरात्री
22 एप्रिल - शनिवार  - रमझान ईद
29 जुलै  - शनिवार  - मोहरम
12 नोव्हेंबर - रविवार  - लक्ष्मी पूजन (दिवाळी)
कामकाजाच्या दिवशी 2023 मध्ये मार्केट बंद असणारे दिवस
26 जानेवारी  - गुरूवार  - प्रजासत्ताक दिन
7 मार्च  - मंगळवार  - होळी
30 मार्च  - गुरूवार - राम नवमी
4 एप्रिल  - मंगळवार  - महावीर जयंती
7 एप्रिल  - शुक्रवार  - गुड फ्रायडे 
14 एप्रिल  - शुक्रवार  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
1 मे   - सोमवार  - महाराष्ट्र दिन / कामगार दिन
28 जून  - बुधवार  - बकरी ईद
15 ऑगस्ट  - मंगळवार  - स्वातंत्र्य दिन
19 सप्टेंबर  - मंगळवार  - गणेश चतुर्थी
2 ऑक्टोबर  - सोमवार  - महात्मा गांधी जयंती
24 ऑक्टोबर  - मंगळवार  - दसरा
14 नोव्हेंबर  - मंगळवार  - दिवाळी बलिप्रतिपदा
27 नोव्हेंबर  - सोमवार  - गुरूनानक जयंती
25 डिसेंबर  - सोमवार - ख्रिसमस
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            