Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Chrome Updates: लवकरच येणार Google Chrome चे नवीन Version, जाणून घ्या सविस्तर

Google Chrome Updates

Image Source : http://www.cnetfrance.fr/

Google Chrome Updates: गुगल याच वर्षी क्रोम 110 लाँच करणार आहे. गुगल सपोर्ट पेजनुसार, ही नवीन Version 7 फेब्रुवारी 2023 ला लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन रिलीझसह, कंपनी जुन्या क्रोमसाठी अॅक्सेस बंद करणार आहे.

Google Chrome Updates: Google Chrome आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनले आहे, बरेच लोक Google Chrome वर दररोज काम करतात. लॅपटॉप असो किंवा मोबाइल डिव्हाइस, Google Chrome आता व्यवस्थितपणे चालत आहे . पण गुगल याच वर्षी क्रोम 110 लाँच करणार आहे. गुगल सपोर्ट पेजनुसार, ही नवीन Version 7 फेब्रुवारी 2023 ला लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन रिलीझसह, कंपनी जुन्या क्रोमसाठी अॅक्सेस बंद करणार आहे. जाणून घेऊया सविस्तर. 

7 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे (It will be launched on February 7)

 नवीन आवृत्ती 7 फेब्रुवारी 2023 ला लॉन्च केली जाऊ शकते, ज्यामध्ये असे होईल की नवीन रिलीजसह, कंपनी जुन्या क्रोमसाठी आपले अॅक्सेस बंद करणार आहे.  यामुळे आता जुन्या कॉम्प्युटरमध्ये क्रोम बंद होणार आहे. असे सांगितले जात आहे की क्रोम 109 ची फाइल Version आहे जी मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमच्या जुन्या दोन Version ला  सपोर्ट करते. विंडोज 7 आणि विंडोज 8.1 हे दोन  Version आहेत.

 पण आता गुगल 15 जानेवारी 2023 रोजी जुन्या क्रोम Version चा सपोर्ट बंद करणार आहे. Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की Chrome 109 ही शेवटचे Version आहे जे  विंडोज 7, विंडोज 8 किंवा विंडोज 8.1 ला सपोर्ट करेल.  वापरकर्ते विंडोज 7 किंवा विंडोज 8.1 वर Google Chrome चे जुने व्हर्जन वापरू शकतील.

Google Chrome चे नवीन Version Chrome 110 (New Version of Google Chrome Chrome 110)

Chrome 110, Google Chrome चे  नवीन Version, हे  Chrome चे पहिले  Version असेल ज्यासाठी Windows 10 किंवा नंतरची आवश्यकता असणार आहे.  Chrome 110 फक्त त्यांच्यावर कार्य करेल. मिळालेल्या माहितीनुसार, वापरकर्त्यांना क्रोम वापरणे सुरू ठेवण्यासाठी त्यांचे कम्प्युटर  Windows 10 किंवा Windows 11 वर अपडेट करावा लागेल. अपडेट केल्यानंतरच युजर्सना सेक्युरिटी  फीचर्स आणि भविष्यात येणाऱ्या अपडेट्सची माहिती मिळणार आहे.  क्रोम 110 पूर्वी जुलै 2021 मध्ये लॉन्च होणार होते परंतु कोविडमुळे त्याचे लॉन्च पुढे ढकलण्यात आले. पण आता Chrome 110 लॉन्चसाठी तयार आहे.