New Traffic Rules January 2023: वर्षअखेरीस हे काम करा पूर्ण, अन्यथा 5000 रूपयांचा भरावा लागेल. दंड नवीन वर्षात शासनाचा नवीन नियम यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. जर तुम्ही वर्षअखेरीस आपल्या गाडीचे हे काम नाही केले, तर तुम्हाला वर्षाच्या सुरूवातीलाच मोठा दंड बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नवीन नियम काय आहे हे जाणून घ्या.
हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावा
1 जानेवारी 2023 पासून तुमच्या वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट(High Security Registration Plate) असणे आवश्यक आहे. तुमच्या वाहनांवर ही प्लेट नसेल, तर ती ताबडतोब बसवून घ्या. हाय सिक्योरिटी नंबर प्लेटबाबतची अधिसूचना सरकारने आधीच जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार नवीन वर्षापासून वाहनाला हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावून घेण्यास सांगितलं होते. 1 जानेवारीनंतर तुमच्या वाहनाला ही प्लेट लावलेली नसेल तर तुम्हाला 5000 रूपयांचा दंड बसू शकतो.
हाय सिक्योरेटी नंबर प्लेट म्हणजे काय?
वाहनाची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तयार करण्यात आली आहे. प्लेटवर HSRP होलोग्राम स्टिकर (HSRP Hologram Sticker) आहे, ज्यावर वाहनाचे इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला असतो. हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो.
वाहनाचा विमा असणे आवश्यक
आगामी काळात वाहनाच्या विम्याचा हप्ता महाग होण्याची शक्यता आहे. कारण आयआरडीएआय सध्या वाहनांचा वापर आणि मेन्टेनन्स यावर आधारित विमा प्रीमियमबाबत नवीन नियमांवर विचार करत आहे. तसेच पुढच्या महिन्याभरात ज्यांचा विमा संपणार आहे, त्यांनी तो आत्ताच रिन्यू करून घेणे आवश्य आहे. नाही तर पुढील वर्षी यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागेल.