Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO : पैसे कमवायला मदत करतील 'हे' नवे 2 इंडेक्स म्युच्युअल फंड, एसआयपी फक्त 500 रुपयांपासून!

Mutual Fund NFO : पैसे कमवायला मदत करतील 'हे' नवे 2 इंडेक्स म्युच्युअल फंड, एसआयपी फक्त 500 रुपयांपासून!

Mutual Fund NFO : पैसे कमवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दोन नवे पर्याय उपलब्ध झालेत. म्युच्युअल फंड एनएफओ प्रकारात नवे दोन फंड आलेत. म्युच्युअल फंड हाऊस यूटीआय म्युच्युअल फंडनं (UTI Mutual Fund ) इक्विटी प्रकारात हे 2 नवीन इंडेक्स फंड आणले आहेत.

यूटीआय फंड हाऊसचे नवीन फंड म्हणजे यूटीआय एस अँड पी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड (UTI S&P BSE housing index fund) आणि यूटीआय निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड (UTI Nifty50 Equal Weight Index Fund). 22 मे 2023पासून या योजनेच्या सबस्क्रिप्शनसाठीची प्रक्रिया सुरू झालीय. गुंतवणूकदार (Investors) या योजनेसाठी 5 जून 2023पर्यंत अर्ज करू शकतात. ही एक ओपन एंडेड योजना (Open ended) आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदार त्यांना गरज असेल तेव्हा ती रिडीम करू शकतात. लाँग टर्म कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशनसाठी हा एक अत्यंत चांगला पर्याय असायला हरकत नाही, असं एसेट मॅनेजमेंट कंपनीचं मत आहे.

यूटीआय एस अँड पी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड

यूटीआय म्युच्युअल फंडातर्फे दिलेल्या माहितीनुसार, कोणीही यूटीआय एस अँड पी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंडात किमान 5000 आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक सुरू करू शकतो. एसआयपीच्या गुंतवणुकीबद्दल अधिक बोलायचं असल्यास, दररोज, साप्ताहिक तसंच मासिक प्रकारात 500 रुपये आणि नंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. किमान तिमाही एसआयपीची (SIP) रक्कम 1500 असणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत एन्ट्री आणि एक्झिट लोड नाही. तर याचा बेंचमार्क निर्देशांक एस अँड पी बीएसई हाउसिंग TRI आहे.

यूटीआय निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड

यूटीआय निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंडात कोणीही गुंतवणूक करू शकतो. किमान 5,000 रुपये आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत ही गुंतवणूक करता येईल. एसआयपी गुंतवणुकीची प्रक्रियाही सोपी आहे. यात तुम्ही दररोज, साप्ताहिक तसंच मासिक 500 रुपये आणि नंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता. किमान तिमाही एसआपी रक्कम अर्थातच 1500 असणार आहे. या फंडात गुंतवणुकीसाठीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. एन्ट्री आणि एक्झिट लोड नाही. तर याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 इक्वल वेट TRI आहे.

कोण करू शकतो गुंतवणूक?

कोणाकोणास गुंतवणूक करता येवू शकते, याविषयी यूटीआय फंड हाऊसनं सविस्तर सांगितलं. एस अँड पी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड दीर्घकालीन एस अँड पी बीएसई हाऊसिंग इंडेक्सच्या परफॉर्मन्सनुसार परतावा मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सर्वात योग्य आहे. दुसरीकडे, निफ्टी 50 इक्वल वेट निर्देशांकाच्या कामगिरीनुसार परतावा हवा आहे, ते गुंतवणूकदार निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्समध्ये गुंतवणूक करू शकतात.

परताव्याची हमी नाही

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही योजनेत परताव्याची हमी देण्यात येत नाही. दोन्ही फंड हे नवीन असून यूटीआयतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एसआयपीदेखील फक्त 500 रुपयांपासून सुरू होते. मात्र यात जोखीम समाविष्ट आहे. परताव्याची कोणतीही हमी देण्यात येत नाही. कंपनीनं याविषयी स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंडाची निवड करावी, तसंच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)