नैसर्गिक गॅसच्या किमतींमध्ये कमालीची घसरण झाली असून अमेरिकेतील MCX मध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती 9 महिन्यांच्या निचांकी किमतीवर आल्या आहेत. तिथे गॅसच्या किमतीत 5 डॉलरने घसरण झाली असून एकूण डिसेंबर महिन्यात नैसर्गिक गॅसच्या किमती 27 टक्क्यांनी खाली आल्या आहेत.
अमेरिकेतील MCX मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत 430 रुपयांपर्यंत खाली आहे. युके आणि युरोपमध्येही गॅसच्यी किमती कमी होत आहेत. युरोपमध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती एका आठवड्यात 32 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर युकेमध्ये 33 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या देशांमध्ये हिवाळ्याला उशीरा सुरूवात झाल्यामुळे नैसर्गिक गॅसच्या किमतीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. मागणीअभावी हे दर खाली आल्याचे काही अभ्यासकांचे निरीक्षण आहे.
जर आपण MCX वरील नैसर्गिक गॅसच्या किमतींवर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, एका आठवड्यात या किमती 20 टक्क्यांपेक्षा जास्तीने कमी झाल्या आहेत. तर एका महिन्यात अंदाजे 24 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. पण वर्षाचा आढावा घेतला तर या किमती वर्षभरात 52 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते.
कच्च्या तेलाची परिस्थिती काय आहे?
कच्च्या तेलामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झालेली दिसून येत आहे. ब्रेंटचा दर 2 टक्क्यांनी वाढला आहे. तो दोन-तीन दिवसांपूर्वी 84 डॉलरपर्यंत पोहोचला होता. तर MCX वर कच्च्या तेलाने 6500 चा टप्पा पार केला होता. अमेरिकेतील क्रूड इन्व्हेंटरी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच रशियावर G-7 देशांना निर्बंध लादल्याने तिथूनही पुरवठा कमी होत आहे. या निर्बंधामुळे रशियामधून कच्च्या तेलाची निर्यात 20 टक्क्यांनी कमी झाली आहे.