Narmada Jilatines ला वारंवार 5 टक्क्याचा अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवारी देखील या शेअर्सच्या किमतीत 5 टक्क्याची वाढ झाली. हा शेअर इतकी मोठी उसळी का घेतोय ते जाणून घेऊया
नर्मदा जिलेटीन्स लिमिटेड ही विशेष रसायन उत्पादन व्यवसायाशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरला वारंवार 5 टक्क्याचा अप्पर सर्किट लागल्याचे दिसून येतं आहे. शुक्रवारीही या शेअर्समध्ये 5 टक्के म्हणजे 26 रु. 95पैसे इतकी वाढ़ झाली आहे. आता हा शेअर 566.15 रुपयावर पोचला आहे. आठवडाभरात 33.68 टक्के इतकी वाढ झाली आहे. 142.65 रुपये इतकी ही वाढ आहे. महिनाभरात तब्बल 339.20 रुपयांची म्हणजे 149.46 टक्के इतकी वाढ झाली आहे. 52 आठवड्याचा नीच्चांक 160 रुपये तर उच्चांक 566.15 रुपये इतका राहिला आहे. मागील वर्षभरातील परताव्याचा विचार केला तरी या शेअर्सने 211.24 टक्के इतका परतावा दिला आहे. मात्र अलिकडेच या शेअर्सच्या किमतीत झपाट्याने वाढ होतेय.
प्रती शेअरमागे मिळणार 100 रुपये लाभांश
नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड ही विशेष रसायन उत्पादन व्यवसायशी संबंधित एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Narmada Jilatines आपल्या गुंतवणूकदारांना 100 रुपये प्रती शेअर इतका विशेष लाभांश जाहीर करणार आहे. 1000 टक्के प्रती शेअर इतका हा विशेष अंतरिम लाभांश असणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठो हा विशेष लाभांश दिला जाईल. शेअर होल्डर्सना 30 दिवसांच्या आत कंपनी लाभांश वितरण करणार आहे. ही बातमी आली आणि Narmada Jilatines च्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागतं आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)