Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance vs Mutual Funds: इन्शुरन्सला म्युच्युअल फंड हा पर्याय होऊच शकत नाही? का जे जाणून घ्या!

Life Insurance Vs Mutual Fund

Life Insurance vs Mutual Funds: म्युच्युअल फंड काय किंवा लाईफ इन्शुरन्स काय, हे एकमेकांना कधीच पर्याय ठरू शकत नाहीत; पण ते एकमेकांना पूरक मात्र नक्की ठरू शकतात.

“Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully,”  म्हणत म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट केव्हा मध्यमवर्गीय घरातील आर्थिक नियोजनाचा भाग बनली, समजलेच नाही. एकाच घरातील 2 पिढ्यांच्या अनुभवांची स्पर्धा सुरु झाली, ती त्यांच्या पैशांच्या गुंतवणुकीच्या आणि परताव्याच्या टक्केवारीमधून. सिनिअर पिढी अजूनदेखील पोस्टातील गुंतवणूक, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि रिकरिंग डिपॉझिट्सवर भरवसा ठेवणारी. कॅपिटल मार्केटच्या उदयानंतर जन्माला आलेली पिढी मात्र “म्युच्युअल फंड… सही है.....” म्हणत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे धोके आणि आव्हान स्वीकारण्यात उत्सुक. मात्र दोन्ही पिढ्यांना जोडणारा दुआ म्हणजे “आयुर्विमा” अर्थात “लाईफ इन्शुरन्स” (Life Insurance). म्युच्युअल फंड काय किंवा लाईफ इन्शुरन्स एकमेकांना पर्याय कधीच नव्हते, पण एकमेकांना पूरक मात्र नक्की ठरू शकतात.

जोखीम जेवढी अधिक; तेवढा फायदा अधिक!

“लाइफ इन्शुरन्स पॉलिसी” नावाप्रमाणे आर्थिक सुरक्षिततेचे वचन देते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान (Policy term) पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला डेथ-क्लेमची रक्कम दिली जाते. पॉलिसी टर्म यशस्वीपणे पूर्ण करतानाही पॉलिसीधारकाला “मॅच्युरिटी बेनिफिट्स” अधिक “कालांतराने जमा झालेली बोनसची रक्कम” असा दुहेरी लाभ मिळतो. युनिट-लिंक्ड प्लॅन्स, एंडोमेंट प्लॅन इत्यादींच्या बाबतीत तुमच्या गुंतवणुकीवर परतावा देखील असतो. तसे हे तुलनेने कमी आहेत. मात्र म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवरील मिळणारा परतावा लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्समध्ये प्राप्त होऊ शकणाऱ्या रिटर्न्सच्या तुलनेमध्ये जास्त असतो. “”जितना जादा खतरा, उतनाही ज्यादा मुनाफा” अर्थात अधिक जोखीम घेतल्याचा लाभ म्युच्युअल फंडस् मोठ्या प्रमाणात देतात. मात्र म्युच्युअल फंडसचा उद्देशच मुळात “संपत्ती वाढवणे” हा असल्याने त्यामध्ये कोणतेही लाईफ कव्हर किंव डेथ बेनिफीट्स असत नाहीत. 

दीर्घकाळासाठी लाईफ संरक्षित राहते!

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक अगदी 500 रुपये इतक्या किमान रकमेपासून सुरु करू शकतो. एवढेच नाही तर SIP (Systematic Investment Plan) सारख्या योजनांद्वारे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवूनदेखील मार्केटमधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आपण एन्जॉय करू शकतो. मात्र म्युच्युअल फंडस् हे short term investment साठी उपयुक्त असतात. याउलट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेली नियमित प्रीमियमची रक्कम गुंतवणुकीची आर्थिक शिस्त तर लावतेच, परंतु दीर्घकालीन (long term) चांगला कॉर्पस (निधी) उभा करण्यास मदत करते.  

लाईफ इन्शुरन्समधील गुंतवणूक जरी सुरुवातीच्या काळामध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये खर्चिक वाटली तरीदेखील कालांतराने ती किफायतशीर ठरते. मात्र इक्विटी म्युच्युअल फंडवर भराव्या लागणाऱ्या “फंड मॅनेजमेंट चार्जेस”चा फंडाच्या वाढीवर निश्चितच परिणाम होतो. 

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीसाठी केलेली 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक भारतीय आयकर कायदा, 1961च्या कलम 80 (C) नुसार कर भरण्यापासून सवलतची (Tax exemption) हमी देतेच, परंतु इन्शुरन्सच्या कोणत्याही क्लेमच्या रक्कमेवर कलम 10(10 (D)) अंतर्गत कोणताही कर लावला जात नाही. मात्र केवळ ELSS (equity-linked savings scheme) म्युच्युअल फंडातील गुंतवणूकच इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80 (C) नुसार कर कपातीसाठी पात्र ठरते.

जेव्हा आपण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा विचार करतो, तेव्हा योग्य वेळी, योग्य त्या प्रॉडक्टमध्ये आणि योग्य त्या प्रमाणात केलेली गुंतवणूक अपेक्षित रिझल्ट्स देते. प्रत्येकाची गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारची असू शकते आणि प्रत्येक प्रॉडक्ट हे काही चांगल्या आणि वाईट गोष्टींसह येत असते. त्यामुळे, योग्य निर्णय हा शेवटी आपली ध्येय (life goals), उत्पन्न, जोखीम घेण्याची क्षमता (Risk appetite) आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादींवर अवलंबून असतो.