Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Long Term Vs Short Term: नवीन गुंतवणूकदाराने कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे?

Long Term Vs Short Term Investment

Long Term Vs Short Term: लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म (Long Term & Short Term) प्रत्येक प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये (Investment) मोठी भूमिका बजावत असतात. पण अनेक वेळा यातील गोंधळामुळे गुंतवणूकदाराला चांगल्या संधीला मुकावे लागते. हाच गोंधळ दूर करण्यासाठी लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Long Term Vs Short Term: कोणताही गुंतवणूक करताना त्याचा त्याचा कालावधी ठरवणे खूप गरजेचे असते. नाही तर गुंतवणूक करताना गोंधळ होतो. जसे की, गुंतवणूक (Investment) लॉन्ग टर्म करायची की शॉर्ट टर्म? लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म (Long Term & Short Term) प्रत्येक प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये (Investment) मोठी भूमिका बजावत असतात. पण अनेक वेळा यातील गोंधळामुळे गुंतवणूकदाराला चांगल्या संधीला मुकावे लागते. हाच गोंधळ दूर करण्यासाठी लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म यामध्ये नेमका काय फरक असतो? आणि गुंतवणूक (इन्व्हेसमेंट) करताना यातील बेस्ट काय असू शकते?

शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? What is Short Term Investment?

शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट जी कमी वेळासाठी केली जाते. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमधील जास्तीत जास्त काळ हा 3 वर्षांपर्यंतचा असू शकतो. अनेक वेळा मार्केटमध्ये चालू घडामोडींचा फायदा उचलण्यासाठी शॉर्ट टर्म इन्वेस्ट्मेन्ट्सचा वापर केला जातो. जसे की, सोन्याची किंमत (Gold Rate) कमी झाली की सोने विकत घेतले जाते. अगदी अशाच पद्धतीने शॉर्ट टर्म इन्वेस्ट्मेन्ट्स काही महिन्यांसाठी किंवा ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. 

गुंतवणूक केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकाराक शॉर्ट टर्म इन्वेस्टमेन्टचा ऑप्शन असतोच. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट हे अस्थिर (Volatile) असतात आणि यांच्या किमतीत सतत होणाऱ्या लहानसहान बदलांमुळे गुंतवणूकदाराला त्यातून फायदा मिळवणे शक्य होते. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटची उदाहरणे सांगायची झाली तर, बँकेतील मुदत ठेवी (Fixed Deposit), म्युच्युअल फंड (Mutual Fund), शॉर्ट-टर्म बॉण्ड्स (Short Term Bonds), मनी मार्केट फंड (Money Market Fund) इत्यादी.


लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? What is Long Term Investment?

लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट (Long Term Investment) म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट जी आपले फायनान्शिअल गोल्स (आर्थिक उद्देश) पूर्ण करण्यासाठी केली जाते. या गोल्समध्ये दुसरे घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण आणि त्यांची लग्ने किंवा निवृत्तीपश्चात सुखमय जीवन (रिटायरमेंट) इत्यादींचा समावेश होतो. लॉन्ग टर्म इन्वेस्ट्मेन्ट्समध्ये लिक्विडीटी (Liquidity)असल्यामुळे त्यातून चांगले रिटर्न्स मिळवता येतात. अनेक इन्वेस्टर्स ठराविक स्ट्रॅटेजीचा वापर करून लॉन्ग टर्म इन्वेस्ट्मेन्ट्स करतात. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट प्रमाणेच लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ही कोणत्याही प्रकारात किंवा अॅसेटमध्ये करता येते. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटद्वारे केल्या जाणाऱ्या अॅसेट्मधील वाढ हळू-हळू होत असते.

सर्वांना परिचित असणारी आणि सर्वसामान्यांकडून यामध्ये वर्षानुवर्षे होत असणारी  लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिअल इस्टेट (Real Estate) आहे. पूर्वीपासून बरेच जण घराची विक्री ही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून प्रचलित आहे. ही गुंतवणूक अनेक वर्षांपर्यंत धरून ठेवता येते. त्याचप्रमाणे काही जण लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून म्युच्युअल फंड आणि बाँड्स यामध्येही गुंतवणूक करतात.

नवीन गुंतवणूकदाराने कोणता मार्ग निवडला पाहिजे? Which Type New Investor Should Choose?

आपल्या पोर्टफोलिओमध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट यांचा समतोल (बॅलेन्स) असला पाहिजे. प्रत्येक गुंतवणूकदाराने चांगल्या अॅसेट्समध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ज्यामुळे त्याला आरामदायी जीवन जगता येईल आणि या काळात संपत्तीत वाढ करणे शक्य होईल. मार्केटमधल्या सततच्या चढ-उतारांपासून किंवा घडामोडींपासून दूर राहायचे असेल तर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ही योग्य ठरू शकते. 

याचबरोबर गुंतवणुकदाराने आपला पोर्टफोलिओ बॅलेन्स (Balance) ठेवण्यासोबतच तो डिव्हर्सिफाय (Diversified) राहील यावर लक्ष्य ठेवले पाहिजे. जसे की, वेगवेगळ्या प्रकारातील स्टॉक्स, बॉण्ड्स यामधून पोर्टफोलिओमध्ये विविधता येण्यास मदत होऊ शकते.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)