घरात किंवा जमिनीत (Real Estate) केलेली गुंतवणूक ही अनेकदा दीर्घकालीन (Long Term Investment) गुंतवणूकच असते. पण, अलीकडच्या बदलत्या काळात रिअल इस्टेट इतर साधनांच्या (Asset Class) तुलनेत किती परतावा गुंतवणूकदारांना देतो असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महानगर प्रदेश हद्दीत पश्चिमेला बोरिवली (Borivali), मिरारोड (Mira Road), विरार (Virar) तर मध्य उपनगरांमध्ये ठाणे (Thane), कल्याण (Kalyan) , डोंबिवली (Dombivali) हे भागही धरण्यात आले आहेत.
आणि घरांच्या किमतींचा डेटा अॅनारॉक रिसर्च या संस्थेकडून घेतला आहे. आणि त्यांच्या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीने 2015 पासून 2022 या कालावधीत सरासरी 13% परतावा दिला आहे.
MMR भागात 2015 मध्ये प्रतीवर्गफूट 10,280 रुपये मोजावे लागत होते. तीच किंमत आता11,2560 रुपयांवर गेली आहे. ही सरासरी वाढ झाली. तर मुंबईतल्या कुठल्या उपनगरांत सगळ्यात वाढ झाली याची माहिती देताना अॅनारॉक रिसर्चने म्हटलंय, ‘पनवेल आणि मिरारोड या दोन उपनगरांमध्ये घरांच्या किमती थेट 30% नी वाढल्या आहेत.’
मिरारोडमध्ये 2015मध्ये घरांच्या किमती सरासरी 10,800 प्रती वर्गफूट इतक्या होत्या. तिच किंमत आता 14,000 वर पोहोचली आहे. पनवेलमध्ये सात वर्षांपूर्वी 6,900 रुपये हा दर होता. तो आता 9,000 रुपयांवर पोहोचला आहे.
ठाण्याच्या पूर्व भागात दरातली वाढ सगळ्यात कमी होती. 2015 मध्ये 17,550 रुपये प्रतीवर्ग फूट इतका दर 2022 मध्ये 19,300 रुपये प्रती वर्गफूटांवर पोहोचला. ही वाढ 10% होती.
घरांची मागणी कुठे सगळ्यात जास्त आहे?
ठाणे - पश्चिम, डोंबिवली, कल्याण, बोरिवली आणि मिरा रोड इथं सगळ्यात जास्त नवीन गृह प्रकल्प या काळात उभे राहिले. त्या दृष्टीने ही उपनगरं सगळ्यात हॅपनिंग होती असं मानलं जातंय. ठाणे - पश्चिम भागात 14,712 नवे प्रकल्प उभे राहिले. त्या खालोखाल डोंबिवलीमध्ये 10,746 नवे प्रकल्प उभे राहिले. कल्याणमध्ये 5,968, बोरिवलीमध्ये 5,264 आणि मिरारोड इथं 5,098 नवे प्रकल्प उभारले गेले.