Mukesh Ambani: सध्या मुकेश अंबानी यांचा चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) याची सोशल मिडीयावर तुफान चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे नुकताच यांचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika Marchant) हिच्याशी झाला. हा साखरपुडा राजस्थान येथील राजसमंद जिल्हयातील नाथव्दारा येथील प्रसिध्द मंदीर श्रीनाथजी येथे झाला. या साखरपुडयाची चर्चा देशभरात अफाट होताना दिसत आहे. तसेच त्यांची तिन्ही मुले कोणत्या घरात दिली आहेत, याची ही जोरदार चर्चा आहे. चला, तर जाणून घेऊयात मुकेश अंबानी यांच्या तिन्ही व्याहीची (Father in Law) एकूण संपत्ती.
अनंत अंबानी सासरे-वीरेन मर्चंट संपत्ती (Viren Marchant Property)
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा नुकताच राधिका मर्चंट हिच्याशी साखरपुडा संपन्न झाला. राधिकाच्या वडिलांचे म्हणजेच अनंत अंबानी यांच्या सासऱ्याचे नाव वीरेन मर्चंट आहे. वीरेन मर्चंट(Viren Marchant) यांचे नाव श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत येते. ते आरोग्य सेवा कंपनी Encore चे संस्थापक आहेत. मीडिया रिपार्टनुसार, त्यांच्याकडे एकूण संपत्ती 755 कोटी रूपये आहे.
ईशा अंबानी सासरे - अजय पिरामल संपत्ती (Ajay Piramal Property)
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) यांचा विवाह 12 डिसेंबर 2018 रोजी आनंद पिरामल (Anand Piramal) यांच्यासोबत झाला. पिरामल ग्रुप हा देशातील सर्वात मोठया काॅर्पोरेट घराण्यांपैकी एक आहे. अजय पिरामल यांची कंपनी ही फार्मा, हेल्थकेअर व फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित आहे. विविध देशात त्यांच्या कंपनीच्या 30 शाखा आहेत. त्यांच्याकडे एकूण 24,825 कोटी रूपयांची संपत्ती आहे.
आकाश अंबानी सासरे - अरूण मेहता (Arun Mehta Property)
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) यांचा विवाह 9 मार्च 2019 रोजी श्र्लोका मेहता (Shloka Mehta) यांच्याशी झाला. श्र्लोका ही हिरे व्यापारी अरूण मेहता यांची मुलगी आहे. मेहता हे रोझी ब्लू कंपनीचे एमडी आहेत. त्यांची कंपनी ही जगातील टॉप डायमंड कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतातील 26 शहरांमध्ये 36 पेक्षा जास्त त्यांची दुकाने आहेत. आज त्यांची कंपनी ही 12 देशामध्ये हिऱ्यांचा व्यवसाय करते. आज अरूण मेहता यांच्या नावी 3000 कोटी रूपयांची संपत्ती आहे.