Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSSC Vs Bank FD: महिलांनी कुठे गुंतवणूक करणे ठरेल फायद्याचे, जाणून घ्या!

MSSC Vs Bank FD

MSSC Vs Bank FD: सध्याच्या घडीला महिलांना गुंतवणुकीसाठी दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पहिला पर्याय हा महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) हा तर दुसरा पर्याय बँकेची एफडी (Bank FD) आहे. यापैकी कोणत्या पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर जास्त फायदा मिळू शकेल, जाणून घेऊ.

महिलांनी जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक करावी या हेतुने यावर्षीच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Certificate Scheme) जाहीर केली. पोस्ट ऑफिसकडून चालवण्यात येणाऱ्या या योजनेत महिलांना दोन वर्षासाठी गुंतवणूक करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट (Repo Rate) वाढवल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात देखील वाढ केली आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीचे हे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यापैकी कोणत्या पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर फायद्याचे ठरू शकेल, जाणून घेऊ.

know-these-things-before-investing.jpg
MSSC Vs Bank FD

व्याजदर आणि गुंतवणूक कालावधी जाणून घ्या

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत (MSSC) केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करता येते. सरकारने या योजनेत 7.5% निश्चित व्याजदर दिला आहे. मात्र या योजनेत केवळ 2 वर्षासाठीच गुंतवणूक करता येईल. जर तुम्हाला देखील महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.

रेपो रेट वाढल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. सध्या एसबीआय बँक (SBI Bank) ग्राहकांना दोन वर्षाच्या एफडीवर 6.80% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याजदर देण्यात येत आहे. तसेच एचडीएफसी बँक (HDFC Bank) सर्वसामान्य ग्राहकांना दोन वर्षासाठी 7% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर देत आहे. बँकेच्या एफडीमध्ये कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. त्यासाठी वयाची किंवा स्त्री-पुरुष असण्याची मर्यादा नाही. तसेच 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत बँकेतील एफडीमध्ये गुंतवणूक करता येते.

किमान आणि कमाल गुंतवणूक जाणून घ्या

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत (MSSC) किमान 1,000 रुपये ते कमाल 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ज्यावर निश्चित स्वरूपातील व्याजदर दिला जात आहे. तर बँकेतील एफडीमध्ये (FD) ग्राहक किमान 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देखील गुंतवू शकतात. ज्यावर निश्चित स्वरूपात व्याजदर देण्यात येते.

कर सवलत आहे का?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना कर सवलत (Tax Benefit) देण्यात आलेली नाही. त्यामुळे यातील उत्पन्नावर TDS कापला जाईल. तर बँकेतील 2 वर्षाच्या एफडीवरील व्याजावर ग्राहकांना TDS भरावा लागणार आहे. 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर ग्राहकांना कर सवलत देण्यात येते. कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहक एफडीचा कालावधी वाढवू शकतात. 

Source: hindi.moneycontrol.com