Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSSC Scheme: दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यावर, मॅच्युरिटीवर मिळतील एकरकमी 'इतके' पैसे

MSSC Scheme

MSSC Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी 'महिला सन्मान बचत पत्र योजने'ची घोषणा बजेट दरम्यान केली. यामध्ये 2 वर्षासाठी गुंतवणूक करून चांगला फंड तयार करता येऊ शकतो. दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यावर, मॅच्युरिटी वेळी नेमकी किती रक्कम तयार होईल, जाणून घेऊयात.

देशाच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेची (MSSC Scheme) घोषणा केली. ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून महिलांसाठी चालवण्यात येत आहे. महिलांनी आर्थिक गुंतवणूक करावी या हेतूने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना 2025 पर्यंत वैध असून 2 वर्षासाठी यामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.

महिला सन्मान बचत पत्र योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यातील गुंतवणुकीवर सध्या 7.5% व्याजदर (Interest Rate) देण्यात येत आहे. याचा परिपक्व कालावधी हा 2 वर्षाचा असल्याने मॅच्युरिटीनंतर एकरकमी मोठी रक्कम महिलांना मिळू शकते. यात वार्षिक आधारावर किमान 1000 रुपये, तर कमाल 2 लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. यामध्ये गुंतवणूक करून महिला एक चांगला फंड तयार करू शकतात. एकरकमी मोठी गुंतवणूक गुंतवणे शक्य नसेल, तर दररोज 100 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी मोठी रक्कम मिळवता येऊ शकते.

दररोज 100 रुपये गुंतवल्यावर मॅच्युरिटी वेळी किती रक्कम मिळेल?

mssc-1.jpg
Source: Investtales.com 

महिला सन्मान बचत पत्र योजनेत जर तुम्ही दररोज 100 रुपयांची गुंतवणूक केली, तर तुमच्यावर एकरकमी पैशांचा भार येणार नाही. 100 रुपये दिवसा गुंतवले, तर वर्षाचे 365 दिवस झाले. 365 × 100 केले, तर वर्षाला तुम्ही 36500 रुपये महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवू शकता. दोन वर्षात ही रक्कम 73,000 रुपये इतकी असेल.

Investtales Calculator च्या हिशोबाने 73,000 रुपये दोन वर्षासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवल्यावर मॅच्युरिटी वेळी गुंतवणूकदाराला 11,696 रुपये निव्वळ व्याज मिळेल. गुंतवणूकदाराने भरलेली मुद्दल 73,000 रुपये आणि व्याज मिळून मॅच्युरिटी वेळी 84,696 रुपये एकरकमी मिळतील.

या रकमेवर कर भरावा लागेल का?

महिला सन्मान बचत पत्र योजनेतील गुंतवणूक ही आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत कर सवलतीचा पात्र नाही. यातील उत्पन्नावर सरकारला TDS भरावा लागतो. थोडक्यात कर सवलतीच्या उद्देशाने जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल, तर त्याचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही.