Tax Exemption On MSSC : 1 एप्रिल 2023 रोजी 'महिला सन्मान बचत पत्र' ही योजना औपचारिकपणे सुरु करण्यात आली. आणि आता ती 1.59 लाख पोस्ट ऑफीसमध्ये उपलब्ध आहे. या योजनेत कोणतीही महिला दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकते. या योजनेत गुंतविलेल्या पैश्यांवर 7.5 टक्के व्याज दिले जाणार आहे. या योजनेत केवळ महिलाच पैसे गुंतवू शकतात. तसेच मुलीच्या नावाने पैसे गुंतवायचे असल्यास आणि मुलगी अल्पवयीन असल्यास तिचे पालक तिच्या नावाने पैसे गुंतवू शकते. या योजनेत जास्तीत जास्त दोन लाख रुपये आणि कमीत कमी 1000 रुपये अशी गुंतवणूकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
खाते कुठे उघडणार
महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलेला काही इमरजंसी आल्यास, एक वर्षानंतर ती तीच्या खात्यामधून 40 टक्के अंशतः रक्कम काढू शकते. MSSC खाते गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकतात.
योजना करपात्र आहे की नाही?
महिला सन्मान बचत पत्र या योजनेतील गुंतवणूक आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत सूट मिळण्यास पात्र नाही . या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज करपात्र आहे. याचा अर्थ,कर-बचत मुदत ठेवींप्रमाणे, या योजनेत तुम्हाला कर लाभ मिळू शकत नाहीत. तसेच महिला सन्मान बचत पत्र योजनेतील व्याज उत्पन्न करमुक्त नाही. एकूण व्याज उत्पन्न आणि वैयक्तिक कर स्लॅबवर अवलंबून TDS कापला जातो.
अंतिम मॅच्युरिटी किती?
जर गुंतवणूकदारांनी 2 वर्षांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात 2 लाख रुपये गुंतवले तर ते मुदत ठेवीप्रमाणेच कार्य करते.त्या व्याजात आणि गुंतवलेले मुद्दल तिमाही आधारावर जमा केले जाते. परिणामी अंतिम मॅच्युरिटी (Maturity) 2.32 लाख रुपये असेल.