Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

mPassport Police Verification: आता फक्त 5 दिवसात पूर्ण होईल पासपोर्ट व्हेरिफिकेशन, कसे जाणून घ्या

Passport Verification

mPassport Police Verification: परदेश मंत्रालयाने खास दिल्लीकरांसाठी mPassport सेवा सुरु केली आहे. या अंतर्गत दिल्लीकरांना फक्त 5 दिवसात पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून मिळाणार आहे. ते कसं जाणून घ्या

तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल, तर पासपोर्ट (Passport) सोबत असणे गरजेचे आहे. नवा पासपोर्ट बनवण्यासाठी किमान 15 दिवस वाट पाहावी लागते. मात्र आता दिल्लीकरांसाठी सरकाने एक खास सेवा सुरु केली आहे. पासपोर्ट बनवू इच्छिणाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी 'mPassport' नावाने ही सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत आता पासपोर्ट व्हेरिफिकेशन (Passport Verification) अवघ्या 5 दिवसांत पूर्ण होणार आहे.

पूर्वी पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी लोकांना बराच वेळ वाट पाहावी लागत होती, पण आता या सुविधेमुळे दिल्लीकरांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होणार आहे. सध्या ही सुविधा केवळ दिल्लीकरांना देण्यात येतीये. ऑनलाईन पद्धतीने दिल्लीत राहणारे लोक त्यांच्या मोबाईल, कॉम्प्युटर आणि टॅबलेटच्या मदतीने पासपोर्ट पडताळणी करू शकणार आहे. ती नेमकी कशी जाणून घ्या.

mPassport सेवा काय आहे?

परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी पासपोर्टशी संबंधित सेवा मोबाईलवर पुरवण्यास सुरुवात केली आहे. mPassport Seva हे अॅप वापरून वापरकर्ते पासपोर्ट सेवा पोर्टलवर उपलब्ध असलेली सर्व कामं करू शकतात. जसं की, नवीन युजरची नोंदणी, विद्यमान युजर्सचं लॉगिन, पासपोर्ट सेवांसाठी अर्ज करणं, ऑनलाईन पेमेंट करणं, अपॉइमेन्टची वेळ ठरवणं, पासपोर्ट सेंटरचे लोकेशन निवडणं, फी जाणून घेणं, केलेल्या अर्जाचा स्टेटस चेक करणं आणि यासारख्या अनेक गोष्टी या माध्यमातून वापरकर्त्याला वापरता येणार आहेत.

या सुविधेमुळे काम सोपं होईल

पीटीआयच्या (PTI) अहवालानुसार, दररोज सरासरी 2000 अर्जदारांना पासपोर्ट दिला जातो. भारतात लवकरच जी-20 परिषद भरणार असल्याने दिल्ली पोलिसांसमोर वेगवेगळी आव्हानं आहेत. या सर्व गोष्टींमुळे कदाचित पासपोर्ट व्हेरीफिकेशनला (Passport Verification) वेळ लागू शकतो. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने ही सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि वेळेत व्हेरिफिकेशनही पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाईन पासपोर्ट पोलीस पडताळणी कशी करावी?

  1. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पासपोर्ट सेवा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल
  2. यानंतर तुम्हाला त्यावर लॉगिन करावे लागेल
  3. आता तुम्हाला "Apply for Police Clearance Certificate" या पर्यायावर जावे लागेल
  4. नवीन ओपन झालेल्या पेजवरील संपूर्ण माहिती भरावी लागेल
  5. त्यानंतर तुम्ही पेमेंट आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता
  6. अपॉइंटमेंट बुक झाल्यावर, प्रिंट आउट डाउनलोड करा आणि आपल्यासोबत पासपोर्ट केंद्रावर घेऊन जा 
  7. सर्व कागदपत्रांसह तुम्हाला स्थानिक पासपोर्ट केंद्राला भेट द्यावी लागेल, जिथे तुमची अपॉइंटमेंट बुक केलेली असेल

या कामांसाठी वापरले जाते पासपोर्ट

पासपोर्ट हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे, जे केवळ परदेशात जाण्यासाठीच नाही, तर इतर कारणांसाठीही वापरले जाते. तुम्ही ओळखपत्र, बँक खाते उघडण्यासाठी आणि इतर कारणांसाठीही पासपोर्ट वापरू शकता.