स्मार्टफोन ब्रँड Motorola लवकरच आपला नवीन बिझनेस-ग्रेड स्मार्टफोन ThinkPhone लॉन्च करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2023) मध्ये कंपनी या फोनची पहिली झलक देणार आहे. ThinkPhone ची विक्री बिझनेस-ग्रेड स्मार्टफोन म्हणून केली जात आहे. या फोनच्या लॉन्चसाठी कंपनीने अधिकृतपणे ट्विटरवर टीझर जारी केला आहे. मोटोरोला थिंकफोनला टेक्सचर बॅक पॅनलसह स्पॉट केले गेले आहे, जे अलीकडील सर्व लीकशी जुळते. फोनच्या डिव्हाइसमध्ये अॅल्युमिनियम फ्रेम आणि 'अरॅमिड फायबर इनले' मागील शेल आहे, अशी माहिती याविषयी पुढे आलेली आहे.
मोटोरोलाने ट्विट करून नवीन थिंकफोनविषयी माहिती दिली आहे. कंपनी 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान लास वेगास येथे होणाऱ्या CES 2023 टेक कॉन्फरन्समध्ये ThinkPhone लाँच करणार आहे.
Motorola ThinkPhone ची संभाव्य फीचर्स
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Motorola Thinkphone ला 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस POLED डिस्प्ले मिळेल, जो (1080 x 2400) पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमने सुसज्ज आहे. मागील अहवालानुसार, डिव्हाइस उत्पादकता केंद्रित फीचर्ससह येईल. फोनला स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन वन प्रोसेसरसह 12 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल.
Motorola ThinkPhone कॅमेरा
थिंकफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल माहिती पुढे आली आहे. फोनला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येईल. फोनमध्ये 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. थिंकफोनला 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळू शकते. थिंकफोनसह 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टेड असेल. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP68 रेटिंग आहे.