लग्न (Marriage) म्हटल्यावर खर्च तर येणारच. लोक लग्नात प्रचंड पैसा खर्च करतात. सामाजिकदृष्ट्या पुढारलेपण दाखवण्यासाठी हा खर्च केला जातो. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसलेले लोकदेखील कर्ज काढून, उसणे पैसे घेऊन लग्नात वारेमाप पैसा खर्च करतात. पण लग्नात पैसा गरजेचा आहेच. अशावेळी ईपीएफओमध्ये तुमचं खातं असेल तर तुमची पैसे जमवण्याची डोकेदुखी बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते. कारण ईपीएफओ (Employee's Provident Fund Organisation) अशाप्रसंगी आगाऊ पैसे घेण्याची किंवा पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
Table of contents [Show]
आकस्मिक गरजांच्या वेळी उपयोगी
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी सामाजिक सुरक्षेचा सर्वात मोठा आधार म्हणजे पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी. याचं मॅनेजमेंट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत केलं जातं. जीवनातल्या अनेक आकस्मिक गरजांच्या वेळी याचा मोठा उपयोग होत असतो. तसंच नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ही जी रक्कम आहे ती उर्वरित आयुष्यासाठी मोठी हमी असते. नोकरी सुरू असताना विशिष्ट रक्कम ईपीएफओत दीर्घकाळासाठी जमा केल्यास निवृत्तीनंतर मोठा दिलासा असतो. यात जोखीम नाही. त्यामुळे हा पर्याय उत्तम मानला जातो.
कोविडपासून सुविधा
ईपीएफओ विविध प्रसंगात आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देते. अडीच-तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारी आली, तेव्हा ईपीएफओनं आपल्या सदस्यांना कोविड अॅडव्हान्सची (Covid Advance) सुविधा उपलब्ध करून दिली होती. तुमची नोकरी गेली तरी तुम्हाला पीएफ काढण्याची सुविधा मिळत असते. त्याचप्रमाणे तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल किंवा दुरुस्त करायचं असेल, तुमचं स्वतःचं लग्न असो किंवा मुलांचं, तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता.
मिळेल शेअरच्या 50 टक्के
नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये ईपीएफओनं लग्नानिमित्त पीएफमधून पैसे काढण्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ईपीएफओच्या या ट्विटनुसार, जर खातेधारकाचं स्वतःचं लग्न किंवा भाऊ-बहीण किंवा मुला-मुलीचं लग्न असेल तर अशा प्रसंगी ईपीएफओ मॅरेज अॅडव्हान्सच्या सुविधेचा लाभ घेता येईल. या अंतर्गत तुमच्या शेअरच्या 50 टक्के इतकी रक्कम व्याजासह काढता येवू शकते.
EPF members can also avail advance for marriage.#AmritMahotsav #epfowithyou #epf #advanceformarriage @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @PIB_India @MIB_India @AmritMahotsav pic.twitter.com/jgfEahztnd
— EPFO (@socialepfo) May 23, 2023
फक्त 'या' दोन गोष्टी लक्षात ठेवा
ईपीएफओ मॅरेज अॅडव्हान्स या सुविधेअंतर्गत पीएफमधून पैसे काढण्यासाठी काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. ईपीएफओनंही या अटींबाबत सांगितलं आहे. पहिली अट म्हणजे तुम्ही किमान सात वर्षे ईपीएफओचे सदस्य असायवा हवेत. दुसरी अट अशी आहे, की तुम्ही लग्न आणि शिक्षणासह 3पेक्षा जास्त वेळा अॅडव्हान्सची सुविधा घेऊ शकत नाही. म्हणजे लग्न किंवा शिक्षणाच्या नावावर पीएफमधून जास्तीत जास्त 3 वेळा पैसे काढता येवू शकतात.