Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजाज ऑटो शेअर बायबॅक प्रस्तावावर सोमवारी बैठक

BAJAJ SHARES BAJAJ MEETINGS

बजाज कंपनीची (Bajaj Company) सोमवारी (दि. 27) बायबॅक संदर्भात बैठक होणार आहे; त्यापूर्वीच बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये (Bajaj Auto stock Price) 4 टक्क्यांनी वाढ झाली.

बजाज ऑटो कंपनीच्या (Bajaj Auto Company) पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्सच्या बायबॅकच्या (Bajaj auto buyback 2022) प्रस्तावावर विचार करण्यासाठी कंपनीची सोमवारी (दि. 27) संचालक मंडळाची बैठक होणार असल्याची घोषणा कंपनीने केल्यानंतर बजाज ऑटोचा शेअर आज 4.10 टक्क्यांनी वाढला. बजाज ऑटोचा शेअर (Bajaj Auto stock Price) बीएसईवर (Bombay Stock Exchange) 3,629.80 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत 4.10 टक्क्यांनी वाढून 3,784.80 रुपयांवर पोहोचला.

बजाज ऑटोचे शेअर्स 5-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा (सरासरीपेक्षा) अधिक ट्रेड करत आहेत. पण 20-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा कमी आहेत. 2022 मध्ये हा शेअर 14.06 टक्क्यांनी वाढला आणि एका वर्षात 11.75 टक्क्यांनी घसरला. एकूण 7,022 शेअर्सनी बीएसईवर 2.61 कोटी रुपयांची उलाढाल केली. त्यामुळे कंपनीचे मार्केटमधील भांडवल 1.07 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

कंपनीने 14 जून रोजी शेअर बायबॅकचा विचार केला होता. पण अचानक कंपनीने शेअर बायबॅकचा प्रस्ताव (Bajaj auto buyback news) पुढे ढकलल्याचे सांगितले. परिणामी त्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये 7.13 टक्क्यांनी घसरण होऊन शेअरची किंमत 3603.75 रूपयांवर आली. त्यानंतर बुधवारी (दि. 22 जून) कंपनीने, संचालक मंडळाची बैठक येत्या सोमवारी म्हणजे 27 जून रोजी होणार असल्याचे घोषित केले आणि पुन्हा एकदा कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहावयास मिळाली. 

सोमवारच्या बैठकीत कंपनी पेड-अप इक्विटी शेअर्सच्या बायबॅकच्या प्रस्तावावर सेबीच्या बाय-बॅक ऑफ सिक्युरिटीज, नियम, 2018 ला अनुसरून चर्चा करणार आहे. दरम्यान, कंपनीने यापूर्वी वर्ष 2000 मध्ये शेअर बायबॅक केले होते. त्यावेळी भागधारकांनी 1.8 कोटी इक्विटी शेअर्सच्या बायबॅकला 400 रुपये (Bajaj auto buyback price) प्रति शेअर दराने मंजुरी दिली होती.

बजाज ऑटो कंपनीच्या दुचाकींच्या विक्रीत या वर्षभरात 15 टक्क्यांनी घट झाली. मे, 2021 मध्ये 1,80,212 दुचाकींची निर्यात (Two Wheeler Export) केली होती. त्या तुलनेत मे, 2022 मध्ये 1,53,397 दुचाकींची निर्यात करण्यात आली होती.