Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजाज बनवणार दरमहा 5000 इलेक्ट्रिक स्कूटर्स

bajaj chetak e scooter

बजाज आपल्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी (Bajaj Electric Scooter) चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत आणणार असून कंपनी पुण्याच्या नवीन प्लांटमध्ये वर्षाला 5 लाख दुचाकींचे उत्पादन करणार आहे

इंधनाच्या सतत वाढणाऱ्या  किमतीमुळे सर्वसामान्य व्यक्ती इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आपणही पुढे असावे या हेतूने आता बजाज मोटर्सने (Bajaj Motors)  शुक्रवारी 10 जून रोजी पुण्यातील आकुर्डी येथील प्लांटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन लाइन लाँच केले. या प्लांटमध्ये कंपनीने प्रति महिना 5,000 चेतक इलेक्ट्रिक स्कूटर (Bajaj Chetak E Scooter) तयार करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. कंपनी आता आपल्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत आणणार असून कंपनी नवीन प्लांटमध्ये  वर्षाला 5  लाख दुचाकींचे उत्पादन करणार आहे. सध्या, बजाज चेतक इलेक्ट्रिकची (E Scooter Price 2022) एक्स-शोरूम किंमत 1.42 लाख रुपये आहे.


बजाज मोटर्सचे सीईओ राजीव बजाज (Rajiv Bajaj EV Chetak) यांनी म्हटले की, 32 वर्षांपूर्वी आम्ही स्थानिक बाजारासाठी वेस्पा (Vespa) बनवत होतो. आता आम्ही ग्लोबल मार्केटसाठी प्रॉडक्ट बनवत आहोत. आमच्या बाईक्स वर्ल्ड क्लास आहेत. आज बजाज जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी आहे. त्यांनी म्हटले की, चेतक आम्ही 2019 मध्ये बनवली होती. तेव्हापासून त्यावर काम सुरु आहे. तसेच आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा एकदा बाजारात मोठ्या संख्येने चेतक स्कूटर (Chetak Scooter) आणण्यासाठी तयार झालो आहोत.  

कोरोनाचा 'चेतक'वर परिणाम 

बजाजने ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची लोकप्रिय स्कूटर चेतक इलेक्ट्रिक (Bajaj Chetak E Scooter) लॉन्च केली होती. या स्कूटरला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, कोविडमुळे उत्पादनात घट झाली होती. अशा परिस्थितीत कंपनीने काही काळ बुकिंग घेणेही बंद केले होते, तर सुरुवातीला ही स्कूटर फक्त 2 शहरांमध्ये उपलब्ध होती. परंतु आता कंपनीने  देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही स्कूटर लॉन्च केली आहे. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Bajaj Chetak E Scooter) मागणीत आता वाढ झाली आहे, हे लक्षात घेऊन कंपनी चेतकच्या निर्मितीसाठी स्वतंत्र उत्पादन  तयार करत आहे. बजाजचा अंदाज आहे की, ते दर महिन्याला चेतकच्या सुमारे 5 हजार  युनिट्सचे उत्पादन करणार आहेत. कंपनीने मे महिन्यात 2500 युनिट्सचे उत्पादन केले होते. जे आतापर्यंतचे सर्वाधिक होते.

मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ 

बजाज चेतकला (Bajaj Chetak E Scooter) आजपर्यंत 16 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत आणि 14 हजार चेतक स्कूटर वितरित करण्यात आल्या आहेत. या स्कूटरला देशाच्या अनेक भागातून मागणी आहे. त्यामुळे या दिशेने पाऊल टाकत कंपनीने उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आगामी काळात उत्पादन वाढवेल आणि दररोज 800 इलेक्ट्रिक स्कूटर तयार करेल. मागील वर्षात सुमारे 9 हजार चेतक स्कूटरचे उत्पादन आणि विक्री झाली होती. वाढल्या इंधन दरवाढीने इलेक्ट्रिक स्कुटरची मागणी वाढत असल्याने हे उत्पादन महिना किमान 2500 स्कूटर बनविण्याचा प्रयत्न करणार आहे.

सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत असल्याने नागरिक इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) पसंती देत आहेत. याच ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून बजाज कंपनीने त्यांचा जुना चेतक  ब्रँड पुन्हा एकदा बाजारात आणला आहे.

image source - https://bit.ly/3zFNfmH