Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile Phones : Realme 10 Pro 5G सीरिज भारतात लाँच  

रियल मी फोन

Image Source : www.realme.com

Realme 10 pro सीरिजमधला 5G फोन भारतात लाँच झाला आहे. त्याची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्य जाणून घेऊया. मध्यम रेंजमध्ये उत्तमोत्तम फिचर्स देणारे आणि टिकाऊ फोन म्हणून रिअल मी फोनची ख्याती आहे.

रियलमी कंपनीने (Realme Mobiles) स्मार्टफोनच्या बाजारात प्रो 10 सीरिजमध्ये दोन फोन आणले आहेत. ‘द रियलटाईम 10 प्रो’ आणि ‘रियलटाईम 10 प्रो प्लस’ अशी या फोनची नावं आहेत. प्रो प्लस फोनमध्ये मध्यम प्राईज रेंजमध्ये (Price Range) पहिल्यांदा कर्व्ह्ड एमोल्ड (Curve AMOLED) स्क्रीन देण्यात आली आहे.      

रियलमी 10 प्रो आणि प्रो प्लस या दोघांची फिचर्स वेगवेगळी आहेत. फ्रंट साईड (Front Side) आणि डिस्प्लेमध्ये (Display) मात्र सारखाच आहे.      

प्रो प्लस फोनमध्ये स्टोरेजचे तीन ऑपशन आहेत. त्याचबरोबर व्हर्च्युअल रॅमचा प्रयोग यावेळी कंपनीने केला आहे. त्यामुळे फोनचं डिझाईनही सुटसुटीत झालं आहे. फोनची स्क्रीन 25,000 पेक्षा कमी किंमत असलेल्या फोनमध्ये सध्या सर्वोत्तम आहे. एकतर तिचा आकार 6.7 इंच इतका मोठा आहे. आणि कर्व्ह तसंच AMOLED पद्धतीचा आहे. आणि स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका चांगला आहे.      

फोनचा चिपसेट 6nm क्षमतेचा आहे. आणि अलीकडे भारतात लाँच झालेल्या फोनमध्ये ही यंत्रणा सर्वोत्तम पैकी एक आहे. त्यामुळे फोनची कार्यक्षमता सुधारायला मदत झाली आहे.     

प्रो प्लस फोनमध्ये तीन कॅमेरा लेन्स आहेत. आणि यातली एक 108 MP क्षमतेची आहे. त्यामुळे रॉ फोटोंची गुणवत्ताही सर्वोत्तम असणार आहे. कॅमेराची क्षमता बघितली तर फ्रंट कॅमेरा 16MP क्षमतेचा असेल. व्हीडिओ चॅट किंवा सेल्फीसाठी तो उत्तम आहे.      

फोनची एलसीडी स्क्रिन फ्लॅट आहे. पण, रिफ्रेश रेट चांगला असल्यामुळे ती कसर भरून निघते असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅप ड्रॅगन 695 चिपसेट बसवण्यात आला आहे.     

16 डिसेंबरपासून हे फोन बाजारात उपलब्ध होतील. हायपरस्पेस, नेब्युला ब्लू आणि डार्क मॅटर या रंगांमध्ये हे फोन उपलब्ध होतील.