Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MAARG Portal: स्टार्टअप चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

MAARG Portal: स्टार्टअप चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

विविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

Piyush Goyal: मार्ग पोर्टलचे (MAARG Portal) उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की ते स्टार्टअप (Start Up) आणि विविध क्षेत्रातील उपक्रम आणि कार्ये यांच्याबाबत हे पोर्टल मार्गदर्शन करेल.   

स्टार्टअप कसे सुरू करावे? (How to start Start Up?): मोदी सरकारकडून स्टार्टअपला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांत सुरू झालेले स्टार्टअप आता युनिकॉर्न (Unicorn) बनले आहेत. तुम्हीही काही निवडक युनिकॉर्नपासून प्रभावित होऊन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. सरकारकडून असे पोर्टल सुरू केले जात आहे, जे स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा त्याविषयी माहिती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.   

पियुष गोयल करणार उद्घाटन   

विविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले की ते स्टार्टअप आणि विविध क्षेत्रातील उपक्रम, टप्पे आणि कार्ये यांच्यात मार्गदर्शन करेल.  मार्ग पोर्टलमध्ये स्टार्टअप्सना मार्गदर्शकांशी संपर्क साधता येईल आणि त्यांच्या समस्यांबाबत माहितीही घेता येईल, असे ते म्हणाले. इथल्या चर्चेतून अनेक गोष्टी सहज सुटू शकतात. पीयूष गोयल सोमवारी होणाऱ्या (16 जानेवारी) कार्यक्रमात अशा स्टार्टअप्स आणि उद्योजकांना सन्मानित करणार आहे ज्यांनी केवळ आर्थिक उत्पन्नच मिळवले नाही तर समाजावर देखील चांगला प्रभाव टाकला आणि उद्योगाची विलक्षण क्षमता दाखवली