Microsoft Surface Duo 3: बदलत्या काळानुसार अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. अनेक स्मार्ट गॅजेट्स बाजारात येत आहेत. दहा वर्षापूर्वी आणि आताच्या तंत्रज्ञानात तुलना केली तर आपल्याला भरपूर फरक दिसून येईल. बजेट रेंजपासून ते प्रीमियम आणि फ्लॅगशिपपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनही बाजारात पाहायला मिळत आहेत. साध्या मोबईलच्या तुलनेत फोल्डेबल मोबईल महाग आहेत, जाणून घेऊया येणाऱ्या नवीन फोल्डेबल मोबईलबाबत.
Microsoft Surface Duo 3 होणार लॉंच (Microsoft Surface Duo 3 will be launched)
मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट आपला फोल्डेबल फोन या वर्षी लॉन्च करण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना सर्वोत्कृष्ट डिझाईन आणि दर्जेदार कॅमेरा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी या वर्षी नेक्स्ट जनरेशन Surface Duo 3 (Microsoft Surface Duo 3) लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनबाबत अजून फारशी माहिती समोर आलेली नाही. पण कंपनी या वर्षी फोल्डेबल फोन बाजारात आणणार हे निश्चित आहे. 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टने आपला Surface Duo 2 मोबाईल फोन लॉंच केला होता.
मायक्रोसॉफ्टचा नवा फोल्डेबल फोन Vivo X Fold आणि Honor Magic Vs सारखा दिसतो. म्हणजेच हा स्मार्टफोन 180 डिग्री रोटेशनला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी हा फोन या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये बाजारात लॉंच करू शकते.
या वर्षी कोणकोणते मोबईल लॉंच होणार? (Which mobile launches will happen this year?)
कोरियन कंपनी सॅमसंग आपली s-23 सीरीज 1 फेब्रुवारीला बाजारात लॉन्च करू शकते. कंपनी एस सीरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पहिला Samsung Galaxy S23, दुसरा Samsung Galaxy S23 Plus आणि तिसरा Samsung Galaxy S23 Ultra आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सची किंमत 80,000 रुपयांपासून 1,20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच, बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 80 हजार असू शकते तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 1,20,000 रुपये असेल.