Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही

Microsoft

Image Source : www.gub.uy.com

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही. Google ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की ते Windows 7 आणि Windows 8.1 साठी Google Chrome ब्राउझरसाठी सपोर्ट बंद करत आहे. Windows 7 आणि Windows 8.1 मधील Google Chrome चे नवीन वर्जन सुद्धा 7 फेब्रुवारीनंतर सपोर्ट करणार नाही.

Google ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की ते Windows 7 आणि Windows 8.1 साठी Google Chrome ब्राउझरसाठी सपोर्ट बंद करत आहे. Windows 7 आणि Windows 8.1 मधील Google Chrome चे नवीन वर्जन सुद्धा  7 फेब्रुवारीनंतर सपोर्ट करणार नाही.

मायक्रोसॉफ्ट त्याच्या काही विंडोजसाठी सिक्युरिटी आणि टेक्निकल सपोर्ट बंद  करणार आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, ते 10 जानेवारी 2023 पासून विंडोज 7 आणि विंडोज 8.1 साठी सिक्युरिटी अपडेट आणि टेक्निकल अपडेट प्रदान करणार नाहीत. मायक्रोसॉफ्ट एज 109 हा कंपनीचा शेवटचा ब्राउझर असेल जो या विंडोजमध्येही काम करेल.

मायक्रोसॉफ्टने हे पाऊल उचलल्यानंतर विंडोज 7 आणि विंडोज 8.1 ला नवीन सिक्युरिटी अपडेट्स मिळणार नाहीत आणि टेक्निकल सपोर्टही मिळणार नाही. डेव्हलपरसाठी WebView2 सपोर्ट  देखील 10 जानेवारीनंतर संपणार आहे.  याच्या मदतीने डेव्हलपर  त्यांचे अॅप्स अपडेट करतात.Google ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की ते, Windows 7 आणि Windows 8.1 साठी Google Chrome ब्राउझरसाठी सपोर्ट बंद करत आहे. Windows 7 आणि Windows 8.1 मधील Google Chrome ची नवीन आवृत्ती देखील 7 फेब्रुवारीनंतर सपोर्ट करणार  नाही.

सिक्युरिटी अपडेट्सच्या कमतरतेमुळे, विंडोज 8.1 आणि विंडोज 7 हॅकर्सच्या टार्गेटवर  राहतील आणि बग मिळण्याची शक्यता अधिक असेल. 2021 च्या अखेरीस विंडोज 7 च्या यूजर्सची  संख्या 100 दशलक्ष इतकी होती. अशा परिस्थितीत या सर्व यूजर्सना  त्यांचे विंडोज अपडेट करावे लागेल. काही महिन्यांपूर्वी याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार  जगभरात Windows 11 पेक्षा 27 दशलक्ष अधिक संगणक Windows XP, 7 आणि 8 वर काम करत आहेत. मायक्रोसॉफ्टने 2020 मध्येच विंडोज ७ यूजर्सना याविषयी सूचित केले होते.