MHADA LOTTERY: मुंबई विभागातील 4082 घरांच्या सोडतीच्या निकालानंतर आता म्हाडाने कोकण, पुणे आणि औरंगाबादमधील सुमारे 10 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मुंबई विभागातील 4082 घरांच्या सोडतीची निकाल नुकताच काढण्यात आला. या निकालदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच पुणे, कोकण आणि औरंगाबादमधील घरांसाठी सोडत काढली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार म्हाडाने आगामी सोडतीची तयार केल्याचे समजते. यात कोकण, पुणे आणि औरंगाबाद विभागातील घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
या नव्याने काढण्यात येणाऱ्या सोडतीत सर्वाधिक घरे म्हणजे एकूण 10 घरांपैकी जवळपास 5 हजार घरे ही कोकण पुणे विभागात, तर कोकण विभागात साडेचार हजार आणि औरंगाबाद विभागात अंदाजे 600 घरे असणार आहेत. या घरांच्या सोडतीची जाहिरात या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात प्रसिद्धि होईल, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिल्याचे कळते.
हे सुद्धा वाचा: Mhada Mumbai Lottery 2023 Result: म्हाडाची मुंबईतील विजेत्यांची यादी इथे तपासा
म्हाडा साधारणपणे या सोडतीसाठी 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करणार असून, त्याच दिवसापासून अर्ज विक्री केली जाणार आहे. जाहिरातीमध्ये अल्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा उत्पन्न गटातील लोकांसाठी घरे असणार आहेत.
कोकण विभागात ठाणे, विरार, बोळिंज, डोंबिवली आदी परिसरात घरे लॉटरीसाठी उपलब्ध असणार आहेत. तर औरंगाबाद विभागात औरंगाबाद, आंबेजोगई आणि लातूरमधील घरांचा समावेश असणार आहे. या तिन्ही विभागांची जाहिरात वेगवेगळी काढली जाणर असल्याचे कळते.
दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी भागातील घरे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्याची पूर्तता आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारच्यावतीने हे निर्णय घेतले जात असल्याचे म्हणणे आहे.