Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mhada Mumbai Lottery 2023 Result: म्हाडाची मुंबईतील घरांची सोडत जाहीर, विजेत्यांची यादी इथे तपासा

Mhada Mumbai Housing Lottery 2023

Mhada Mumbai Lottery 2023 Result: म्हाडाने मुंबई परिमंडळात 4082 घरांची लॉटरी जाहीर (Mhada Mumbai Housing Lottery 2023) केली होती. या घरांसाठी म्हाडाला तब्बल 1 लाख 20 हजार अर्ज प्राप्त झाले होते.

विविध कारणांमुळे लांबलेली म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत आज सोमवारी 14 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत काढण्यात आली. या लॉटरीने चर्चेत आलेल्या दक्षिण मुंबईतील 7.5 कोटी रुपयांच्या सर्वात महागड्या फ्लॅटचे विजेते भाजपचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे ठरले. आजच्या सोडतीनंतर 4 हजार 82 विजेत्यांचे मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले.

म्हाडाने मुंबई परिमंडळात 4082 घरांची लॉटरी जाहीर (Mhada Mumbai Housing Lottery 2023) केली होती. या घरांसाठी म्हाडाला तब्बल 1 लाख 20 हजार अर्ज प्राप्त झाले होते. दक्षिण मुंबईतील ताडदेवसह अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव पहाडी, पवई, सायन, दादर येथील घरांचा या लॉटरीत समावेश होता. 

मुंबईतील लॉटरीसाठी घरांची किंमत 24 लाख ते 7 कोटी 57 लाख रुपये या दरम्यान होती. म्हाडाच्या जाहिरातीनुसार लॉटरीची सोडत 18 जुलै 2023 रोजी काढण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव सोडत लांबणीवर पडली.

म्हाडामधील विजेत्यांची यादी तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन तपासता येईल. म्हाडाने विजेत्यांची यादी वेबसाईटवर अपलोड केली आहे. यादी तपासण्यासाठी अर्ज क्रमांकाचा तपशील सादर करावा लागले.

लॉटरीसाठी 50 हजार ते 1.5 लाख इतकी अनामत रक्कम होती. 4082 फ्लॅटपैकी 1947 फ्लॅट हे प्रधानमंत्री आवास योजनेत राखीव ठेवण्यात आले होते. यातील बहुतांश फ्लॅट पश्चिम उपनगर गोरेगावमधील पहाडी या परिसरात होते.

आज नरिमन पॉइंट येथील यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्र्याच्या उपस्थिती सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मंत्री दिपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

गोरेगावमधील पहाडी परिसरातील 1947 फ्लॅट्ससाठी 22 हजार 472 अर्ज म्हाडाला प्राप्त झाले होते. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 843 फ्लॅट राखीव ठेवण्यात आले होते. त्यासाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले होते. एलआयजी श्रेणीसाठी 1 हजार 34 फ्लॅट राखीव होते. त्यासाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले होते.  

महागड्या घराचे विजेते ठरले आमदार कुचे

दक्षिण मुंबईतील 7 कोटी 57 लाख रुपयांच्या सर्वात महागड्या फ्लॅटचे विजेते भाजपचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे ठरले. विशेष म्हणजे याच फ्लॅटसाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही अर्ज केला होता. तसेच आमदार आमशा पाडवी, माजी आमदार हिरामण वरखडे यांनी लोकप्रतिनिधींसाठी राखीव श्रेणीत अर्ज केला होता. मात्र यात नारायण कुचे यांना नशिबाने साथ दिली. नारायण कुचे हे ताडदेवमधील महागड्या फ्लॅटचे विजेते ठरले.