• 05 Feb, 2023 13:12

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MF Investment in Equity: म्युच्युअल फंडांची वर्ष 2022 मध्ये इक्विटीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक

mutual fund investment

MF Investment in Equity: शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेची म्युच्युअल फंडांना भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.

कोव्हीडमधून सावरलेल्या अर्थव्यवस्थेतील तेजीच्या संधींचा लाभ म्युच्युअल फंडांनी उठवला आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

कोव्हीड ओसल्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. यात तरुण गुंतवणूकदारांनी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. तरुण गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. यात दरमहा नियोजनबद्ध गुंतवणूक (SIP) करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. परिणामी म्युच्युअल फंड उद्योगाला देखील फायदा झाला आहे. वर्ष 2022 अखेर म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनातील एकूण मालमत्ता 40 लाख कोटींवर गेली आहे.

वर्ष 2018 मध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी इक्विटीमध्ये 118690 कोटींची गुंतवणूक केली होती. वर्ष 2019 मध्ये त्या निम्म्याहून अधिक घट झाली. म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये वर्ष 2019 मध्ये 58304 कोटींची गुंतवणूक केली. 2020 मध्ये हे प्रमाण आणखी कमी झाले आणि ते 55413 कोटी इतके मर्यादित राहिले. 2021 मध्ये म्युच्युअल फंडांनी शेअर मार्केटमध्ये 75389 कोटींची गुंतवणूक केली होती. वर्ष 2022 मध्ये हे प्रमाण अडीच पटीने वाढल्याचे समोर आले आहे.

शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक वाढण्याची अनेक कारणे आहेत. कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेतून अर्थव्यवस्था सावरली होती. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये  वस्तू आणि सेवा कर संकलनात देखील दरमहा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये वृद्धी दिसून आली. त्यामुळे एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकादारांनी शेअर मार्केटमधून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला असला तरी म्युच्युअल फंडांनी मात्र खरेदीचा ओघ काय ठेवला. ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजीचा बोलबाला दिसून आला.