Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mercedes New Car Launch: 'Mercedes Benz AMG E53 Cabriolet' होणार 6 जानेवारीला लॉन्च; 'या' कारला देईल टक्कर

Mercedes New Car Launch

Image Source : www.team-bhp.com

Mercedes AMG E53 Cabriolet: 6 जानेवारी रोजी भारतात मर्सिडीज बेंझचे Mercedes AMG E53 Cabriolet हे नवीन मॉडेल लाँच करण्यात येणार असून भारतात या गाडीची किंमत 1.2 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

Mercedes AMG E53 Cabriolet: मर्सिडीज बेंझ(Mercedes Benz) ही अनेकांच्या स्वप्नातील ड्रीम कार(Dream Car) आहे. लग्जरी वाहन निर्माता कंपनी म्हणून मर्सिडीज बेंझ(Mercedes Benz) ही आपल्या चांगलीच परिचयाची आहे. लवकरच 6 जानेवारी रोजी भारतात मर्सिडीज बेंझचे Mercedes AMG E53 Cabriolet लाँच करण्यात येणार आहे. ही कार CBU(Completely Built Up) होऊन भारतात येईल, ज्यामुळे तिची किंमत 1.2 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. चला तर या नव्या कारबद्दल जाणून घेऊयात.  

नवीन मर्सिडीज E53 AMG Cabriolet ही कंपनीच्या E53 AMG सेडानची टू-डोर, 4-सीटरचे नवीन व्हर्जन आहे. कन्व्हर्टेबल ई-क्लास 2010 मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. नवीन सेडानवर नवीन फ्रंट-एंड स्प्लिटरसह सिग्नेचर ग्रिल याला अतिशय चांगला लूक देत आहे.

कारचे वैशिष्ट्ये काय?  

  • या कारच्या आतील भागात, डॅशबोर्डचा लेआउट आणि डिझाईन E53 सेडानसारखे असणार आहे  
  • कारमध्ये बर्मेस्टर साउंड सिस्टम, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह फ्लॅट-बॉटम AMG स्टीयरिंग व्हील, सभोवतालची प्रकाश व्यवस्था, चांगली स्पेस, M-Bux
  • कनेक्टेड कार टेकसह 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि वायरलेस ऍपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो फीचर देखील मिळणार आहे
  • सिस्टीम आणि वायरलेस चार्जिंग उपलब्ध असणार आहे

इंजिन कसं असेल?

  • नवीन E53 Cabriolet मध्ये 3.0-L टर्बोचार्ज्ड, 6-सिलेंडर इंजिन मिळणार आहे 
  • हे इंजिन 435 bhp पॉवर आणि 520 Nm टॉर्क आउटपुट तयार करण्यास मदत करेल
  • हे इंजिन एकात्मिक स्टार्टर जनरेटरसह एकत्रित केले आहे, जे 21hp/249Nm चे अतिरिक्त आउटपुट निर्माण करत आहे  
  • इंजिन 9-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असून जे ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमला शक्ती देते
  • कारला डायनॅमिक सिलेक्ट ड्रायव्हिंग मोड आणि AMG चे राइड कंट्रोल+ एअर सस्पेंशन देखील मिळणार आहे
  • कंपनीचा दावा आहे की ही कार फक्त 4.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते

'ही' कार असेल प्रतिस्पर्धी

BMW X6 ही या कारची प्रतिस्पर्धी मनाली जात आहे. BMW X6 ला 2998 cc, 6 सिलेंडर, पेट्रोल इंजिन दिले गेले आहे , जे स्वयंचलित ट्रांसमिशनशी जोडलेले आहे. X6 ही 5 सीटर कार असून जिची लांबी 4935mm, रुंदी 2212mm आणि 2975mm चा व्हीलबेस आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 1.04 कोटी रुपये इतकी आहे.