Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Organic farming: उत्पन्नावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय शेतीकडे कसे वळता येईल?

production costs

Organic farming: सद्यस्थितीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी लागवड खर्च खूप जास्त प्रमाणावर केला जात आहे. पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याविषयी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

Organic farming: अनेकांचा असा समज आहे की, जेवढा खर्च जास्त तेवढीच उत्पादनात वाढ होते. काही अंशी हे बरोबर असेलही पण खर्च करण्याबरोबरच मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग सुद्धा तितकीच महत्वाची असते. सेंद्रिय शेती करणारे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी अनंत भोयर सांगतात की, मातीमध्ये जेवढी क्षमता आहे तेवढेच ते तुम्हाला देऊ शकते. 

त्यात वेगवेगळे रसायन वापरुन तिला प्रॉडक्टीव बनवले तर ते जास्त काळासाठी टिकत नाही म्हणून निसर्गाने दिलेल्या देणगीचा वापर आहे तसा करा. आणि त्यातुन मिळालेल्या उत्पादनावर प्रक्रिया करून तुम्ही तुमच्या मालाचे दर स्वतः ठरवा. मग पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याविषयी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

शेती करतांना सर्वाधिक खर्च हा तणनाशक, किटकनाशक, सिंचन खर्च, जमिनीची सुपीकता, मजुरी खर्च आणि मशागत खर्च यावर सर्वाधिक होतो. हा खर्च कमी करण्यासाठी विविध शेतकरी अनेक प्रयोग करतात. हा खर्च कमी करण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शेतकरी प्रितम अढाऊ(BSC Agri) यांचेशी महामनीने बातचीत केली. 

तेव्हा त्यांनी सांगितले की, शेती करण्यासाठी सर्वाधिक खर्च हा कीटकनाशके, सिंचन, मजुरी खर्च यावर होतो. पण मी पाच वर्षापासून शेती करीत आहे. मी वेगवेगळे प्रयोग माझ्या शेतात करून बघितले त्यातुन उत्पादन खर्च हा कमी होऊ शकतो हे लक्षात आले आहे. सर्वात आधी….…..

कमी खर्चात शेतातील तण कसे घालवता येईल?

शेतातील तण कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची असते जमिनीची मशागत. मशागत जर खोलवर केली तर जमिनीतील बीज नाहीसे होऊन तणावर नियंत्रण आणता येते. पंजी तीन फाड या अवजारांच्या वापराने जमिनीची मशागत खोलवर होते. त्याच बरोबर बैलजोडीने शेत डवरून सुद्धा तण कमी करता येऊ शकते. मुख्य पिकांच्या मध्यात विविध फळ भाजी, पाले भाजी यांचे पिकं घेतल्यास तण नाहीसे होण्यास मदत होते असे प्रितम अढाऊ यांनी महामनीशी बोलतांना सांगितले.

कीटकनाशकांचा वापर कसा कमी करावा?

याबाबत ते म्हणाले की, निसर्गाने दिलेल्या देणगीचा वापर जर आपण पुरेपुर केला तर कीटकनाशकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. निंबोली अर्क, जीवामृत यासारखे किटकनाशक वापरल्यास खर्च सुद्धा कमी होतो आणि जमिनीची सुपीकता राखली जाते. जास्तीत जास्त नैसर्गिक वापरण्याचा प्रयत्न केला तर कीटक नाशकांवरील खर्च कमी होण्यास मदत होते. त्याचबरोर पिकांची योग्य वेळी पेरणी सुद्धा महत्वाची ठरते.

ओलीत खर्च कसा कमी करायचा?

ओलीतावर कमीत कमी खर्च करण्यासाठी ठिंबक सिंचन आणि तुषार सिंचन महत्वाचे ठरते. दररोज शेतात ओलीत केल्याने जमिनीवरील भाग वाहत जातो, या दोन सिंचनाचा वापर केल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओलीत करता येते आणि जमिनीत पाणी शोषून घेलया जाते. त्याचबरोबर  तूर, मका, बाजरी हे कोणतेही पीक घेता येते. त्यांना पाणी कमी लागते. यामुळे शेतकरी सिंचनाचा खर्चही कमी करू शकतो. 

निव्वळ नफ्यावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने पिकांची निवड करावी, म्हणजेच सिंचनावर कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त नफा मिळवता येतो असेही प्रितम महामनीशी बोलताना म्हणाले.

frost-and-drip-irrigation.jpg
http://www.irrigationsupplyparts.com/

जमिनीची सुपीकता कशी टिकवायची?

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी प्रितम अढाऊ यांच्या मते, एकामागून एक जास्त उत्पादन देणारी पिके घेतल्याने जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढतो. निरोगी पीक घेण्यासाठी, निरोगी माती असणे आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक पद्धतीने माती निरोगी असणे आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. 

रासायनिक शेतीला ऑर्गनिक करण्यासाठी पहिल्या वर्षी 90 टक्के रासायनिक आणि 10 टक्के ऑर्गनिक असे प्रमाण ठरवावे म्हणजे एकावेळी उत्पादनात घट होणार नाही आणि जमिनीला हळूहळू सवय होईल. नंतर दुसऱ्या वर्षी 80 टक्के रासायनिक आणि 20 टक्के ऑर्गनिक असे दरवर्षी 10 टक्के ऑर्गनिक वाढवत जाऊन 100 टक्के शेती ऑर्गनिक होऊ शकते आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हेच महत्वाचे आहे. 

कारण रासायनिकमुळे आपण वांग्याच्या आतील अळी मारू शकतो म्हणजे याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होत असणार याचा विचार करू शकता.

how-to-switch-from-chemical-farming-to-organic-farming.jpg

डी कम्पोजरचा प्रयोग…..

गांडुळांचे मलमूत्र जमिनीला पोषक तत्वे पुरवते. गांडुळाचे वजन सुमारे 10 ग्रॅम असते. तेथा त्याच्या शरीराच्या वजनाच्या 5 पट खातो आणि त्याच प्रमाणात उत्सर्जित करतो चार लाख गांडुळे तीन महिन्यांत सहा लाख टन माती फिरवतात. 

उपचार केलेल्या मातीच्या तुलनेत या मातीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या दुप्पट, नायट्रोजनच्या सात पट, फॉस्फरसच्या अकरापट आणि पोटॅशियमच्या पाच पट जास्त आहे. याशिवाय या जमिनीतील लिग्नाइटमुळे पिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. ते बॅक्टेरिया तयार करण्यास देखील मदत करतात.

worm-manure.jpg
http://www.homesteadandchill.com/

प्रितम यांनी जेव्हा त्यांच्या शेतात ऑर्गनिक प्रयोग करून बघितला तेव्हा गांडूळ संख्या वाढली होती. जिथे निंबोली अर्क, जीवामृत या कीटकनाशकांचा वापर करून प्रयोग केला तेव्हा रासायनिक पेक्षा ऑर्गनिक मध्ये गांडूळ जास्त दिसत होते.

मजुरीवरील खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना

यंत्रांचा वापर केल्याने मजुरीवरील 25 ते 50 टक्के खर्च कमी होतो व पिकाच्या उत्पादनात वाढ होते. पिकांच्या पुर्वमशागतीपासुन ते काढणी व मळणीपर्यंत उपलब्ध असलेल्या कृषि यंत्रांचा वापर करता येऊ शकतो. उदा. गहू, चणा आता हारवेस्टर द्वारे काढता येतो, त्यामुळे मजूरावर खर्च होणार नाही. चार्जिंग पंप, खड्डे करण्यासाठी मशीन, शेण खत फेकण्यासाठी मशीन उपलब्ध आहे.