Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Useful tips for Organic Farming: घरगुती बियाणे वापरुन मिळवू शकता लाखोचे उत्पन्न

Useful tips for Organic Farming: घरगुती बियाणे वापरुन मिळवू शकता लाखोचे उत्पन्न

Organic farming: उद्योग, नोकरी, शेती या तिन्ही पैकी सर्वात मेहनत शेतीमध्ये करावी लागते. निसर्गाने जर साथ दिली नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीची माती होते. काही गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या आहेत त्या आपण अमलात आणल्या पाहिजेत. काही वेळा पिकाला उधळी लागते, ती टाळण्यासाठी काय उपाय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

भारतात 70% लोक शेती करतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काही रासायनिक शेती (Chemical farming) करतात, काही लोक सेंद्रिय शेती(Organic farming) करतात तर काही दोन्ही मिक्स करून शेती करतात. प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते की, आपण पिकाला मुलाबाळाप्रमाणे वाढवल तर त्याचा मोबदला सुद्धा मुबलक मिळायला हवा. कधी कधी खूप काळजी घेऊन थोड्याशा चुकीने पीक वाया जाते. म्हणून पिकांची काळजी कशी घ्यावी आणि पेरणीच्या आधी बियाण्यावर काय प्रोसेस करावी याबाबत जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख. 

दोन एकरमध्ये 16 लाखाचे उत्पन्न 

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बेनोडा गावात बटाईने शेती करणारे अनंत कावरे हे प्रगतशील शेतकरी आहे. त्यांच्याकडे स्वतः ची शेती नाही ते 16 एकर शेती बटाईने  करतात. त्यातील 14 एकर मध्ये संत्रा आणि 2 एकर मध्ये तीन प्रकारचे पीक घेऊन भरगोस उत्पन्न मिळवतात. एक एकरमध्ये तूर आणि 1 एकर मध्ये हळद आणि आलं अशी पिकाची विभागणी केली आहे.  तूर पेरणीसाठी ते घरगुती बियाणे वापरतात तरीही त्यांना एक एकर मध्ये 16 क्विंटल तुरीचे उत्पन्न होते. त्यांची पेरणीची पद्धत पुढीलप्रमाणे, 

बियाण्याला उधळी लागू नये म्हणून काय करावे? 

तुम्ही तूर पेरणीचा विचार करत असाल तर घरचे बियाणे वापरू शकता. रासायनिक पद्धतीचा वापर टाळण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तूर पेरणीच्या आधीच्या दिवशी 100 ग्राम चुना, 1 लीटर गोमूत्र, अर्धा  किलो शेणखत आणि माती भिजवून घ्या. त्यात बियाणे रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाडाच्या सावलीत वाळत ठेवून त्यातीलच बियाणे तुम्ही पेरणीला घ्या. त्यामुळे बियाण्याला उधळी लागत नाही आणि पीक लवकरवर येते. एक एकर शेतीमध्ये 2 किलो तूर बियाणे लागतात आणि 16 क्विंटल तुरीचे उत्पन्न होते.

Pigeon Peas (1)

तूर बियाणे 

खर्च 

उत्पन्न 

1 एकर( 2 किलो तूर)

16 क्विंटल 

हळद आणि आलं (Turmeric and ginger) याचे बियाणे त्यांनी बाहेरून बोलावले त्यासाठी त्यांना  80 हजार रुपये खर्च लागला. या दोन्ही पिकांसाठी त्यांनी कोणत्याही रासायनिक खताचा वापर केलेला नाही. फक्त शेणखताचा वापर करून पिकांची व्यवस्थित काळजी घेतली. 

TURMERIC-1

हळदीसाठी रासायनिक खतांचा वापर केलेला नाही, शेणखताचा वापर करूनच हळदीचे पीक घेतले आणि लाखाच्या घरात उत्पन्न मिळवले. 

खर्च

 उत्पन्न

 40 हजार

 4 लाख 

GINGER

आलं हे पीक घेण्यासाठी सुद्धा शेणखताचा वापर केला, 40 हजार रुपये खर्च लावून 3 लाख रुपये उत्पन्न मिळवले. 

खर्च

 उत्पन्न

 40 हजार

3 लाख 

खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असेल तरच शेतकऱ्याला आनंद मिळतो. हा आनंद उपभोगण्यासाठी शेतकऱ्याला अथक परिश्रम करावे लागतात. हजाराच्या घरात जर खर्च लागत असेल तर उत्पन्न हे लाखाच्या घरातच पाहिजे. रासायनिक खत न वापरता अशाच काही घरगुती युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवू शकता.

घरगुती बियाण्याचे फायदे  

  • यामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ, कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही.
  •  पौष्टिक आणि विषमुक्त अन्न तयार होते.
  • घरगुती बियाणे असल्याने नियमितपणे पिकवलेल्या पदार्थांपेक्षा चवीला चांगले असतात.
  • अन्नपदार्थांमध्येही अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात.
  • यापासून उत्पादित होणारे पदार्थ पशुखाद्य म्हणूनही चांगले असतात.
  • हे पर्यावरणास अनुकूल आहे तसेच ते कमी करणे, पुन्हा वापरणे आणि रिसायकल करण्यास प्रोत्साहन देते.