Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Matheran Toy Train: माथेरानची मिनी ट्रेन वातानुकूलित सलून कोचमधून सैर घडवणार, तिकीटाचे दर जाणून घ्या

Matheran Toy Train

Image Source : www.hindustantimes.com

Matheran Toy Train: नेरळ- माथेरान हा रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक जुना असून भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमधून केलेला हा प्रवास एक थ्रिलींग अनुभव प्रवाशांना देणार आहे.

Matheran Toy Train: तुम्हालाही पिकनिकसाठी नेरळ- माथेरानला जायला आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नेरळ- माथेरान टॉय ट्रेनला आता आलिशान वातानुलित सलून कोच जोडण्यात येणार आहे. या मिनी ट्रेनचा(Matheran Toy train) हा सलून कोच 8 आसनांचा असणार आहे. प्रवाशांना दिवसा किंवा रात्री फॅमिली(family picnic) ट्रीपसाठी हा कोच भाड्याने घेता येणार आहे. माथेरानच्या हिल स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीवरून मध्य रेल्वेने (Central Railway) ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक जुना असून भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमधून केलेला हा प्रवास एक थ्रिलींग अनुभव प्रवाशांना देणार आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

यासाठी भाडे किती असेल?

सेम डे राऊंड ट्रिपसाठी आठवड्यात 32,088 रुपये तर वीकेंडला 44,608 रुपये असणार आहे. रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप आठवड्यातील दिवशी जर असेल, तर 32,088 रुपये डिटेंशन शुल्कासह 1500 रुपये प्रति तास या हिशोबाने असेल. वीकेंडला रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी  44,608 रुपये करांसह डिटेंशन शुल्कासह 1800 रुपये प्रति तास असे भाडे आकारले जाईल.

बुकिंग कशी करावी?

आवडत्या योजनेच्या एकूण भाड्याच्या 20 टक्के आगाऊ रक्कम आणि 10,000 रूपये डिपॉझीट स्वरूपात प्रवासाच्या तारखेच्या 7 दिवस अगोदर भरून एसी सलून बुक करता येते. उर्वरीत 80 टक्के रक्कम प्रवाशांना प्रवासाच्या तारखेच्या 48 तासाआधी भरावी लागणार आहे. अन्यथा बुकींग रद्द समजली जाईल आणि रिफंडही  दिला जाणार नाही.
नेरळ स्टेशन मास्तर किंवा मध्य रेल्वेच्या कोणत्याही जवळच्या रेल्वे स्थानक मास्तरांच्या कार्यालयात युपीआय, पीओएस किंवा कॅशद्वारे या डब्याचे  बुकींग करू  शकतात. नेरळ स्टेशन मास्तरांशिवाय इतर स्टेशनात बुकींग केल्यास पैसे भरल्याची पावतीचा क्रमांक डिपॉझिट भरण्याआधी नेरळ मास्तरांना सांगावा असे मध्य रेल्वेने स्पष्ट  केले आहे.  इतर चौकशी नेरळ चीफ बुकींग सुपरवायझर कडे करता येईल.

ट्रेनची वेळ काय असेल?

  • Trip A - नेरळ वरून सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि माथेरान येथून सकाळी 11.30 वाजता सुटेल
  • Trip B - नेरळ वरून सकाळी 10.25 वाजता सुटेल, तर माथेरान येथून दुपारी 1.05 वाजता सुटेल
  • Trip C - नेरळ वरून दुपारी 2.45 वाजता सुटेल आणि माथेरान येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल
  • Trip D - नेरळ वरून दुपारी 04.00 सुटेल आणि माथेरान येथून संध्याकाळी 6.40 वाजता सुटेल