Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel Offer: 1500 रुपयांत करा तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्ही; Airtel ची भन्नाट ऑफर!

Airtel Offer

Image Source : www.telecomtalk.info

Airtel Xstream Box: एअरटेल डिजिटल टीव्हीच्या एक्सस्ट्रीम बॉक्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकणार आहात.

Airtel  Xstream Box: सध्या काळ हा स्मार्ट पद्धतीने काम करण्याचा काळ आहे. हल्ली घड्याळं(Watch), मोबाईल(Mobile), टॅब(Tab) आणि टीव्ही(TV) हे सगळंच स्मार्ट होत चाललंय. मात्र आजही अनेकांकडे साध्या टीव्ही पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही साध्या टीव्हीला अतिशय कमी किंमतीत अपग्रेड(Upgrade) करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरजही नाही. यासाठी एअरटेल(Airtel) तुम्हाला केवळ 1500 रुपयांत टीव्ही स्मार्ट(Smart TV) करण्याची ऑफर देत आहे. कशी? चला तर जाणून घेऊयात.

कसा होईल साधा टीव्ही स्मार्ट?

हल्ली प्रत्येकाच्याच घरी स्मार्ट टीव्ही(Smart TV) पाहायला मिळत आहे, तशी ती काळाची गरजच झाली आहे. सध्या ओटीटी कंटेन्टचा(OTT Content) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत एअरटेल डिजिटल टीव्हीच्या(Airtel Digital) एक्सस्ट्रीम बॉक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या सामान्य टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकणार आहात. यापुढे तुम्ही OTT कंटेंट Xstream Box च्या मदतीने तुमच्या जुन्या टीव्हीवर देखील पाहू शकणार आहात.

1500 रुपयांमध्ये मिळेल बॉक्स

Airtel Xstream Box तुम्हाला फक्त 1500 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. खरं तर त्याची मूळ किंमत 2650 रुपये इतकी आहे. सध्या airtel कंपनी कडून ही ऑफर ग्राहकांना देण्यात येत आहे. तुम्ही ही एअरटेल सेवा इतर सेवांसह बंडलही करू शकता. एअरटेल ब्लॅकमध्ये येणाऱ्या सेवेसह हे बंडल केले जाऊ शकते. Airtel Xstream Box हा एक सेट-टॉप बॉक्स असून ज्याच्या मदतीने  तुम्हाला SonyLIV, Amazon Prime, Eros Now, Disney + Hotstar सारख्या अनेक ओटीटी ॲप्सचा आनंद घेता येणार आहे.

Xstream Box च्या टॉप फीचर्स काय आहेत?

  • Xstream Box मध्ये ग्राहकांना 5000 हून अधिक ॲप्स व बिल्टइन क्रोमकास्ट(Built In Chromecast) मिळणार आहे 
  • 500 हून अधिक टीव्ही चॅनेल(TV channel) उपलब्ध होत आहेत 
  • गुगल असिस्टंट वरून सर्च आणि Android TV 9 देण्यात आलेले आहे
  • प्रेक्षकांना 4K कंटेटही या माध्यमातून प्रेक्षक पाहू शकतात