महिंद्रा अॅण्ड महिंद्रा समूहाची बहुप्रतिक्षित 'स्कॉर्पिओ एन' (Scorpio N) या कारला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'स्कॉर्पिओ एन'ची 30 जुलै 2022 पासून प्री बुकिंग सुरु झाली. अवघ्या अर्ध्या तासांत तब्बल एक लाखांहून अधिक ग्राहकांनी 'स्कॉर्पिओ एन'ची आगाऊ नोंदणी केली. या प्री बुकिंगने महिंद्रा समूहाने अवघ्या अर्धा तासात 210 कोटींची कमाई केली. प्री बुकिंगला इतका प्रचंड प्रतिसाद मिळालेली स्कॉर्पिओ एन अलिकडच्या काळातील पहिलीच एसयूव्ही ठरली आहे.
'स्कॉर्पिओ एन'ची 21,000 रुपये भरुन प्री बुकिंग करता येणार आहे. या मोटारीची किंमत 11.99 लाख ते 23.90 लाख या दरम्यान आहे. यातील पहिल्या 25000 ग्राहकांना विशेष किंमताचा लाभ मिळणार आहे. दरम्यान 30 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्री बुकिंग प्लॅन्स ओपन झाले. ज्यात अवघ्या मिनिटात 25,000 हून अधिक कार्सची बुकिंग झाली. त्यानंतर बुकिंगचा वेग वाढत गेला आणि अर्धा तासांत एक लाखांहून अधिक स्कॉर्पिओ एन कार बुक झाल्या.
बुकिंगवेळी ट्रॅफिक वाढल्याने तांत्रिक अडचणी दिसून आल्या ज्यामुळे काहींना बुकिंगची प्रोसस पूर्ण करता आली नाही. पेमेंट संदर्भातील तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे कंपनीनं मान्य केले आहे.
बुकिंग केलेल्या ग्राहकांना 15 ऑगस्ट 2022 पर्यंत आपल्या बुकिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याची संधी असेल. 'स्कॉर्पिओ एन'ची 26 सप्टेंबर 2022 पासून डिलिव्हरी करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. त्याशिवाय उत्पादनात टप्प्याटप्यात वाढ केली जाणार आहे. दरमहा 6,000 युनिट्सचे कंपनीचे टार्गेट असून त्यात डिसेंबरपर्यंत 20,000 युनिट्सपर्यंत वाढ केली जाणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी तब्बल एक लाखांहून अधिक युनिट्सची बुकिंग झाल्याने 'स्कॉर्पिओ एन'चा वेटिंग पिरिएड सहा ते आठ महिन्यांवर गेल्याचे बोलले जाते.
image Source:https://tinyurl.com/4x5as7jh