• 02 Oct, 2022 09:18

Mahindra Scorpio N: जाणून घ्या, ‘न्यू महिंद्रा स्कॉर्पिओ एन’चे फिचर्स

Mahindra Scorpio N 2022

Mahindra Scorpio N 2022: न्यू महिंद्र स्कॉर्पिओ एन 2022 एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांचा पर्याय उपलब्ध आहे. या गाडीचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होणार आहे.

Mahindra Scorpio N वैशिष्ट्ये: महिंद्रा अण्ड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने आपली नवीन Scorpio N ही गाडी नुकतीच लॉण्च केली. याचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होणार आहे. कंपनीने पहिल्या 25 हजार बुकिंगसाठी 11.99 लाख रुपये अशी किंमत ठेवली आहे. आज आपण या एसयूव्ही गाडीची विविध वैशिष्ट्ये पाहणार आहोत. या नवीन स्कॉर्पिओ एन ची लांबी 4662 मिलीमीटर असून रुंदी 1917 मिलीमीटर आहे; आणि उंची 1870 मिमी आहे. या नवीन SUV सीटचा व्हीलबेस 2750 मीमी आहे.

महिंद्राच्या या नवीन SUV मध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांचा पर्याय उपलब्ध आहे. पहिला पर्याय म्हणून TGDi mStallion (पेट्रोल) इंजिन देण्यात आले आहे, जे 149.14 kW पॉवर (203PS) आणि 380Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दुसरा पर्याय mHawk (डिझेल) इंजिनसह उपलब्ध आहे, जो 128.6kW पॉवर (175 PS) आणि 400 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. त्याच वेळी, डिझेलवर 4X4 चा पर्याय उपलब्ध आहे.

7 रंगांचे पर्याय उपलब्ध

महिंद्रा स्कॉर्पिओ एन मध्ये 7 प्रकारच्या रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. यात डीप फॉरेस्ट, नेपोली ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट, रेड रे, डॅझलिंग सिल्व्हर, रॉयल गोल्ड आणि ग्रॅण्ड कॅनियन या रंगांचा समावेश आहे.

‘नवीन स्कॉर्पिओ एन’ची बाह्य वैशिष्ट्ये

Mahindra Scorpio N

• रूफ रेल
• सनरूफ
• शार्क-फिन एंटीना
• लोड बेअरिंग स्की रॅक
• स्पॉइलर
• साईड ओपनिंग टेल गेट
• लांब एलईडी टेल लॅम्प
• स्कॉर्पियो स्टिंग क्रोम विंडो लाईन
• डायमंड कट R18 और R17 व्हील्स
• इलेक्ट्रिकल अडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरवीएम

टेक्निकल वैशिष्ट्ये

• नेविगेशनसह 20.32 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम.
• 70+ कनेक्टेड कार फीचर्ससह AdrenoX
• अमेझॉन अलेक्सा बिल्ट-इन
• What3words (w3w) - अलेक्सा इनेबल्ड
• अड्रॉइड ऑटो टीएम (वायर आणि वायरलेस)
• Apple CarPlay कम्पैटिबिलिटी (वायर आणि वायरलेस)
• सोनी 3डी ऑडियो -12 स्पीकर डुअल चैनल सब-वूफरसह 
• रेयर एसी मॉड्यूलसह डुअल जोन FATC
• डुअल कॅमरा - फ्रंट आणि रियर
• वायरलेस चार्जर
• टायर डायरेक्शन मॉनिटर
• टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस)

Mahindra Scorpio N 2022

सेफ्टी फीचर्स

• 6 एयरबॅग (फ्रंट + साईड + कर्टेन)
• ईबीडीसह एबीएस
• इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी)
• ड्रायव्हर ड्राऊजीनेस डिटेक्शन
• ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम
• व्हेईकल डायनमिक कंट्रोल
• हिल होल्ड कंट्रोल
• हिल डिसेंट कंट्रोल
• रोल ओवर मिटिगेशन
• ब्रेक डिस्क वाइपिंग
• इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्रीफिल
• ई-कॉल, एसओएस स्विच

image source -https://bit.ly/39TiVe5