Maharashtra Paid The Highest Tax: कोरोनाचा काळ संपला. या परिस्थितीत अनेक कामे ठप्प झाली होती. मात्र तरी ही देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र कर भरणारे अव्वल राज्य ठरले आहे. चला, तर पाहूयात महाराष्ट्राने किती कर भरला आहे.
महाराष्ट्राने किती भरला एकूण कर
महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत तब्बल 12 लाख कोटींचा कर भरला आहे. महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत आयकरच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक कर भरला असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक कर भरणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर दिल्ली व कर्नाटक हे राज्य आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र का आहे अव्वल
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राने देशाच्या सरकारी खजिन्यात तब्बल 12 कोटींचा कर भरला आहे. यापैकी 2019-20 यावर्षी 3 लाख 84 हजार 258 कोटी रूपये भरले. तर, 2020-21 मध्ये 3 लाख 31 हजार 969 कोटी भरले आहेत. तसेच, 2021-22 या वर्षांत महाराष्ट्राने देशाच्या तिजोरीत 5 लाख 24 हजार 498 कोटी रुपये भरले आहेत. स्टार्टअप्समध्येही महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो. तसंच, क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीतही महाराष्ट्र पहिल्या दोन क्रमांकात आहे. त्यामुळे राज्यातून सर्वाधिक कर भरला जातो. कोरोनाचे सावट दूर होताच पुन्हा बाजार आणि व्यवहार सुरळीत झाले. त्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षांत कर संकलनात वाढ झालेली दिसत आहेत.