Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Movie: शाहरूख खानचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नाशिकमध्ये हाऊसफुल्ल, तिकिटाचे दर दुप्पट असून ही....

Pathan Housefull in Nashik

Image Source : http://www.timesnownews.com/

Shahrukh Khan Pathan Movie: पठाण चित्रपटाविषयी मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या गाण्यांपासून ते ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत काही ना काही कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. वादग्रस्त परिस्थितीत अडकलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटासाठी थिएटर बुक होऊ लागले आहेत.

Pathan Advance Booking: महाराष्ट्रात वेड, वाळवी नंतर आता पठाण हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. विशेष म्हणजे शाहरूख खान (Shahrukh Khan) चा पठाण (Pathan) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नाशिकमध्ये (Nashik)अॅडव्हान्स बुकिंगमध्ये (Advance Booking) थिएटर बुक होऊ लागली आहेत, याविषयी सविस्तर माहिती घेवुयात. 

नाशिकमध्ये पठाण हाऊसफुल्ल (Pathan Housefull in Nashik)

महाराष्ट्रात नाशिक शहरात पठाण या चित्रपटाचे दररोज 66 शो होणार आहेत. मालेगाव शहरातील पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपट दाखविण्याचा ट्रेंड नाशिकमध्येदेखील सुरू झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो सकाळी सात वाजता, तर शेवटचा शो मध्यरात्री बाराला सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी दिवसभरात वीस तास हा चित्रपट दाखविला जाणार आहे. सकाळच्या शो च्या तिकिटाचे दर हे नाॅर्मल शंभर रुपये असतात, तर दुपार व सायंकाळच्यावेळी तिकीटाचे दर हे 300 रुपये असतात, मात्र पठाण चित्रपटाच्या सकाळच्या तिकिटाचे दर तीनशे, तर दुपार व सायंकाळच्यावेळी तिकीटाचे दर हे 480 म्हणजे जवळपास दुप्पट आहेत. मात्र तरी हा चित्रपट नाशिकमध्ये प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल्ल होत आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. .

नाशिकमध्ये थिएटरला किती शो (How many shows to theaters in Nashik)  

नाशिक शहरात दररोज पठाण या चित्रपटाचे 66 शो होणार आहेत. यामध्ये दी झोन मल्टिप्लेक्सला 12 शो, सिनेमॅक्स (सीटी सेंटर मॉल) या थिएटरला 21 शो, आयनॉक्सला 10 शो,  दिव्य अॅडलॅब्ज (सिडको) ला 14 शो आणि सिनेमॅक्स रेजिमेंटल प्लाझा या ठिकाणी 9 शो होणार आहेत. पहिला शो सकाळी सात वाजता पाहता येणार आहे, तर शेवटचा शो रात्री बाराला संपणार आहे. अशा प्रकारे पठाणची नाशिकमध्ये तुफान क्रेझ दिसत आहे.