Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lulu Group : लुलू ग्रुप भारतात करणार 10,000 कोटींची गुंतवणूक; 28,000 नोकऱ्या देणार

Lulu Group

Image Source : www.indiaherald.com

UAE (United Arab emirates) स्थित लुलू ग्रुपकडे सध्यस्थितीत आखाती देशासह जगभरात 255 स्टोअर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत. त्यांनी भारतात आणखी गुंतवणूक वाढवण्याचे ठरवले आहे. या गुंतवणुकीबाबत माहिती देताना युसूफ अली म्हणाले की, आम्ही भारतात 20,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. यापुढे आणखी 10000 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत.

शॉपिंग मॉल (Shopping Mall) क्षेत्रातील प्रसिद्ध आणि यूएई (युनायटेड अरब अमिराती) स्थित लुलू हा व्यावसायिक समूह भारतात 10000 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षात केली जाणार आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या LuLu ग्रुपच्या प्रकल्पामध्ये ही गुंतवणूक केली जाईल. लुलू ग्रुपचे अध्यक्ष युसूफ अली (Yusuff Ali MA) यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, लुलू समूह (Lulu Group) भारतात आणखी 28000 लोकांना रोजगार देणार असल्याचेही अली यांनी यावेळी जाहीर केले.

UAE (United Arab emirates) स्थित लुलू ग्रुपकडे सध्यस्थितीत आखाती देशासह जगभरात 255 स्टोअर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत. त्यांनी भारतात आणखी गुंतवणूक वाढवण्याचे ठरवले आहे. या गुंतवणुकीबाबत माहिती देताना युसूफ अली म्हणाले की,आम्ही भारतात 20,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. यापुढे आणखी 10000 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत.

28000 जणांना रोजगाराची संधी : Employment opportunities

लुलू समुहाचे भारतात सध्या 5 शॉपिंग मॉल आहेत. लुलू ग्रुपचे भारतात 50,000 रोजगार निर्मितीचे ध्येय आहे. आत्तापर्यंत त्यांनी देशात एकूण 22 हजार रोजगाराची निर्मिती केली आहे. आगामी काळात 10000 कोटींची गुंतवणूक वाढवण्यासह लुलू ग्रुप आणखी 28,000 नोकऱ्या देणार असल्याचेही अली यांनी स्पष्ट केले.

तेलंगणामध्ये 3500 हजार कोटी गुंतवणार Investments in Telangana

लुलू समूहाने पुढील पाच वर्षांत तेलंगणामध्ये 3500 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. लुलू समुहाकडून हैद्राबादसह तेलंगणातील इतर काही महत्त्वाच्या शहरात शॉपिंग मॉल, हॉटेल आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती युसूफ अली यांनी दिली.

अहमदाबाद, चेन्नईत शॉपिंग मॉलचे काम सुरू

लुलू समुहाच्या भारतातील गुंतवणुकीबाबात बोलतान अली म्हणाले, आम्ही अहमदाबाद आणि चेन्नई या दोन शहरात शॉपिंग मॉलचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच नोएडा आणि तेलंगणामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करत आहोत. या प्रकल्पांमध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.