Diwali मध्ये जसं घराघरात "उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानांची वेळ झाली" ही जाहिरात (AD) ऐकायला मिळते. तसंच अलीकडे "मार्च अखेर आली आयकर परतावा (Income Tax Returns) भरायची वेळ झाली" असा आवाज कानात गुंजत असतो. आणि मग searching सुरू होते ते म्हणजे कर वाचवायचा कसा. अलीकडे कर सूट मिळविण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला आमच्या Mahamoney.com वर वाचायला मिळेल. या कर सूट साठीचा आणखिन एक पर्याय आहे तो म्हणजे रजा प्रवास भत्ता (LTA).
Table of contents [Show]
रजा प्रवास भत्ता - Leave Travel Allowance (LTA)
रजा प्रवास भत्ता म्हणजे असा भत्ता ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सहलीसाठी केलेल्या प्रवासाचा खर्च कंपनीकडून भरून दिला जातो. जरी कंपनीकडून आपल्याला हा खर्च दिला जाणार नसेल तरी हरकत नाही. पण कंपनीला या भत्त्याचा उल्लेख आपल्या पगाराच्या रचनेमध्ये करायला सांगणे गरजेचे आहे. कारण जर आपल्या पगारामध्ये रजा प्रवास भत्तेचा उल्लेख असेल तरच आयकर कायदा 1961 (Income Tax Act - 1961) नुसार आपण या प्रवास खर्चावर ही कर सूट मिळवू शकतो.
रजा प्रवास भत्त्याचा दावा कशाप्रकारे करता येतो?
आयकर विभागाकडून चार-चार वर्षाचा रजा प्रवास भत्त्याचा कालावधी ठरवला जातो. या चार वर्षाच्या कालावधीमधून केवळ दोन वेळेच्याच रजा प्रवास भत्त्याच्या परताव्यासाठी आपण दावा करू शकतो. उदा. अलीकडचा एलटीए कालावधी 2018-2021 तर यापूर्वीचा एलटीए कालावधी 2014-2017 असा होता. या 2014-2017 कालावधी मध्ये जर आपण फक्त एकाच सहलीचा खर्च आयकर परतावामध्ये दाखवला असेल आणि त्यातल्या दुसऱ्या सहलीचा प्रवास खर्च दाखवण्याचा राहिला असेल तर तो पुढच्या एलटीए कालावधीतल्या पहिल्याच वर्षात म्हणजे 2018च्या आयकर परतावा मध्ये दाखवणे गरजेचे आहे.यासाठी आपल्याला प्रवास खर्चाची बिलं सादर करावी लागतात.
रजा प्रवास भत्ता अंतर्गत कर सूट साठी आपण कोणत्या खर्चावर दावा करू शकतो?
हा रजा प्रवास भत्ता मिळविण्यासाठी काही नियम व अटी आहेत. यामध्ये केवळ देशातंर्गत प्रवासाचाच आपल्याला खर्च मिळत असतो. त्यातही फक्त प्रवासाचाच खर्च दिला जातो. राहण्याचा, जेवणांचा व इतर खर्चाचा समावेश नसतो.
विमान प्रवास
विमान प्रवासामध्ये आपण इकॉनॉमी क्लासने प्रवास करू शकतो.
रेल्वे प्रवास
रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करताना फर्स्ट क्लास एसी च्या डब्यातून केलेला प्रवासाचा खर्च कर सूट मिळविण्यासाठी पात्र असतो.
इतर प्रवास साधनाच्या माध्यमातून केलेला प्रवास
यामध्ये जर रेल्वे आणि विमानाने प्रवास न करता इतर वाहनांची सेवा वापरत असू तर फर्स्ट क्लास किंवा ड्युलेक्स क्लासचा खर्च आपल्याला कर सूट साठी दाखवता येतो.
जर आपण एकाच सुट्टी मध्ये दोन-तीन ठिकाणी फिरायला जाणार असू तर आपल्या घराच्या ठिकाणापासून सर्वात दुरचे जे ठिकाण असेल तेथ पर्यंतच्या प्रवासावर आपल्याला कर सूट मिळू शकते.
रजा प्रवास भत्त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश करता येतो?
रजा प्रवास भत्त्याअंतर्गत आपण स्वत:चा व कुटुंबातील सदस्यांचाही खर्च दाखवू शकतो. यामध्ये पती-पत्नी,दोन अपत्य (1 ऑक्टो.1998 पूर्वी जन्माला आलेल्या अपत्यांस हा नियम लागू नसेल.), आई-वडील, भावंडे यांचा प्रवास खर्च दाखवू शकतो.