तेल विपणन कंपन्यांनी (Oil marketing companies) आज एलपीजी (LPG – Liquified Petroleum Gas) सिलेंडरची किंमत जाहीर केली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांविषयी बोलायचे झाले तर कंपन्यांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. मात्र, यावेळीही सरकार भाव कमी करेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडर म्हणजेच 19 किलो सिलिंडर आणि 14.2 किलो घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच जुन्या दरातच ते उपलब्ध होतील.
Table of contents [Show]
घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (Price of domestic LPG cylinder)
घरांमध्ये वापरली जाणाऱ्या नवीनतम एलपीजी सिलिंडरची किंमत जुन्या किंमतीत उपलब्ध असेल. कोलकातामध्ये 1079 रुपये, दिल्ली मध्ये 1053 रुपये, मुंबईत 1052.5 रुपये, चेन्नईत 1068.5 रुपये भाव असणार आहे.
19 किलोग्रॅम एलपीजी सिलिंडरची किंमत (Price of 19 kg LPG cylinder)
दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1744 रुपये आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1696 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत एलपीजी सिलिंडर 1893 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात कमर्शिअल सिलेंडर 1846 रुपयांना मिळणार आहेत.
मागील महिन्यात नोव्हेंबरमध्ये एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 115 रुपयांची कपात करण्यात आली होती. याआधी 1 ऑक्टोबरला त्यात 36 रुपयांची कपात करण्यात आली होती. 14.2 किलोग्रॅम घरगुती सिलिंडरच्या किंमती कमी किंवी लक्षणीयरित्या वाढवल्या गेल्या नाहीत.
महिन्याच्या पहिल्या तारखेला किंमती निश्चित केल्या जातात
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरचे दर ठरवतात. कंपन्या 14.5 किलो घरगुती गॅस सिलिंडर व्यतिरिक्त 19 किलो व्यावसायिक सिलिंडरचे दर निश्चित करतात. त्यांचे दर प्रत्येक महिन्याला बदलले जातात. गेल्या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आणि या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही.