Today's LPG Rates: दिवाळीनंतर LPG सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आज म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून LPG गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. IOCL नुसार, 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115.5 रुपये, कोलकाता 113 रुपये, मुंबई 115.5 रुपये, चेन्नईमध्ये 116.5 रुपये कमी असेल. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी या सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी कमी करण्यात आली होती. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल.
महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती किती?
- दिल्लीत इंडेनचा 19 किलोचा सिलिंडर 1859.5 रुपयांऐवजी 1744 रुपयांना मिळणार आहे.
- कोलकातामध्ये 1846 रुपयांना कमर्शियल सिलिंडर मिळणार आहे. यापूर्वी ते 1995.50 रुपयांना उपलब्ध होते.
- त्याचबरोबर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 रुपयांऐवजी 1696 रुपयांना मिळणार आहे.
- चेन्नईमध्ये LPG सिलेंडर 1893 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी 2009.50 रुपये मध्ये उपलब्ध होते.
महानगरांमध्ये 14.2 किलो सिलिंडरचा दर
| महानगर | किमती | 
| कोलकाता | 1079 | 
| दिल्ली | 1053 | 
| मुंबई | 1052.5 | 
| चेन्नई | 1068.5 | 
देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरची किंमत ठरवतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादींमध्ये वापरला जातो. त्यामुळे त्यांना किमतीतील कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            