Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lowest Gold Loan Interest Rates Offers : सोने तारण ठेवून कर्ज घेताय, या पाच बँका देतात कमी दराने गोल्ड लोन

Gold Loan Offers, Gold Loan Interest Rate, Gold Loan , SBI, PNB

Lowest Gold Loan Interest Rates Offers :काही वेळा आपली तत्कालीन आर्थिक गरज भागवण्यासाठी सोने तारण ठेवण्याचा विचार केला जातो. सोने, सोन्याचे दागिने किवा नाणी बँकेकडे जमा करुन कर्ज मिळू शकते. यातून आपली तातडीची आर्थिक गरज भागवता येते. या कर्ज घेतलेल्या रकमेवर बँक विशिष्ट दराने व्याज आकारते आणि कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने परत केले जातात.

काही वेळा आपली तत्कालीन आर्थिक गरज भागवण्यासाठी सोने तारण ठेवण्याचा विचार केला जातो. सोने, सोन्याचे दागिने किवा नाणी बँकेकडे जमा करुन कर्ज मिळू शकते. यातून आपली तातडीची आर्थिक गरज भागवता येते. या कर्ज घेतलेल्या रकमेवर बँक विशिष्ट दराने व्याज आकारते आणि कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर  तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने परत केले जातात. हे सुरक्षित कर्ज मानले जाते. काही निवडक बँका कमी दराने गोल्ड लोन ऑफर करतात. जाणून घेऊया त्यांची माहिती.

पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank)

 पंजाब अँड सिंध बँक वार्षिक 7 टक्के व्याजदरान गोल्ड लोन देते. ही बँक 25 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सोने तारण ठेवून कर्जाऊ देते. 2 लाखांच्या पुढील रकमेवर 0.50% इतकी प्रोसेसिंग फी असल्याचे बँकेने म्हटलं आहे. 

बँक ऑफ इंडिया (Bank of India)

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया सोने तारण ठेवून ग्राहकांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. यासाठी वार्षिक 7.35% पासून पुढे व्याजदर लागू होतो. 1 लाखापर्यंत गोल्ड लोनसाठी प्रोसेसिंग फी नाही. तर त्यापुढील रकमेवर जास्तीत जास्त 300 रुपये इतकी प्रोसेसिंग फी कर्जदाराला भरावी लागते.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयकडून सोने तारणावर 20 हजार रुपये ते 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. गोल्ड लोनसाठी वार्षिक व्याजदर 7.50% आणि त्यापुढे असा आहे. या बँकेतून गोल्ड लोन घेण्यासाठी लोन अमाउंटवर 0.25% इतकी  प्रोसेसिंग फी आहे. पण YONO app च्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडल्यास प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.

कॅनरा बँक (Canara Bank) 

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक 5 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत गोल्ड लोन देते. यासाठी वार्षिक 7.65% पासून पुढे व्याजदर सुरु होतो. यासाठी प्रोसेसिंग फी लोन अमाउंटवर किमान 0.25% आणि त्याहून अधिक आहे.

पंजाब नॅशनल बँक  (Punjab National Bank )

पंजाब नॅशनल बँक 25 हजार 10 लांखापर्यंत गोल्ड लोन देते. यासाठी 8.75 % व त्यापुढे असा वार्षिक व्याजदर आहे. लोन अमाउंटवर 0.75% इतकी प्रोसेसिंग फी आहे.

बड्या बँकांशिवाय IIFL Finance, HDFC Bank यांचा अनुक्रमे 9.24%, 9.90% इतका व्याजदर आहे. ऐनवेळी पैशाची गरज भागवण्यासाठी गोल्ड लोन हा एक पर्याय असतो. मात्र ते घेताना त्यावर व्यजासोबत प्रोसेसिंग फी किती लागेल, याचाही विचार करणे आवश्यक असते.