• 07 Dec, 2022 09:10

Low budget cars : जाणून घ्या विविध शहरातील बजेट कारच्या ऑनरोड आणि शोरूम प्राईस!

Low budget cars

Image Source : www.renault.co.in

Low budget cars : कार ही पूर्वी लक्झरी खरेदी समजली जात होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये गाड्यांचं प्रॉडक्शन वाढल्याने आणि त्याच्या रॉ मटेरिअलच्या किमती कमी झाल्यामुळे, कंपन्या कमी किमतीत गाड्या विकत आहेत.

Low budget car: प्रत्येकाचे स्वप्नं असतं की, आपल्याकडे कार असावी. बहुतेक स्वप्नं आपल्या कमी बजेटमुळे अपूर्ण राहतात. पण तुमचे स्वप्नं आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. कारण भारतातही कमी बजेटवाल्यांसाठी कार उपलब्ध झाल्या आहेत. आज आपण अशाच काही बजेट कार्सची माहिती घेणार आहोत. त्यासोबतच आपण त्या कारची प्रत्येक शहरात किंमतही जाणून घेणार आहोत. (Low budget cars now available in major cities)

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)

Renault KWID-1
Image Source : www.carwale.com

जेव्हा कमी बजेटच्या कारचा विचार केला जातो, तेव्हा रेनॉल्ट क्विड सर्वात आधी त्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे. रेनॉल्ट 0.8L किंवा 1.0L पेट्रोल इंजिनसह क्विड  ऑफर करते जे क्रमाने 54Ps पॉवर आणि 72Nm टॉर्क आणि 68Ps पॉवर आणि 91Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन विभागात, 0.8L पेट्रोल प्रकार फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे तर 1.0L प्रकार 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड स्वयंचलित सेटअपसह आहे. नवीन क्विडमध्ये वैशिष्टे म्हणजे  8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम त्यात समाविष्ट आहे.  जी अँन्ड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येते, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, कीलेस एंट्री, मागील बाजूस प्रवाशांसाठी 12V चार्जिंग आउटलेट आणि पार्किंग कॅमेरे. मागील क्विडसाठी सुरक्षितता देखील अत्यंत महत्त्वाची आहे कारण ती ड्रायव्हर-साइड एअरबॅग, मागील बाजूस पार्किंग सेन्सर्स सोबतच EBD, ABS सुद्धा येते.

लोकप्रिय शहरांमध्ये नवीन रेनॉल्ट क्विड कारच्या किमती

New Renault Kwid Car Prices in Popular Cities
 

मारुती सुझुकी अल्टो 800 (Maruti Suzuki Alto 800)

Maruti Suzuki Alto 800
Image Source : www.carandbike.com

 मारुती सुझुकी अल्टो 800 ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या कारपैकी एक आहे. मारुतीने कारमध्ये स्पेसिफिकेशन्स किंवा फीचर्स कोणतीही कमी राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. मारुती सुझुकी अल्टो 800 हे 0.8L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनमुळे लहान आणि स्ट्रॉंग आहे जे 48Ps पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पार्टमध्ये, अल्टो 800 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. Alto 800 च्या आत, कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.  ज्यामध्ये अँन्ड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, पॉवर विंडो आणि कीलेस एंट्री आहे. अल्टो 800 मध्ये EBD सह ABS, ड्रायव्हरच्या बाजूला एअरबॅग्ज आणि मागील बाजूस पार्किंग सेन्सर या सर्व सुविधा उपलब्ध आहे. 

लोकप्रिय शहरांमध्ये मारुती सुझुकी अल्टो 800 नवीन कारच्या किमती

Maruti Suzuki Alto 800 New Car Prices in Popular Cities
 

डॅटसन रेडी- गो (Datsun Redi-GO)

Datsun redi-GO
Image Source : www.carwale.com

हे भारतातील बजेट फ्रेंडली कार मधील सर्वाधिक विकल्या जाणारी कार आहे. या कारची रचना भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी डिझाइन केलेली आहे. या कारला दोन इंजिन आहे, एक 0.8L पेट्रोल जे 54Ps पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करते आणि 1.0L पेट्रोल इंजिन जे 69Ps पॉवर आणि 91Nm टॉर्क निर्माण करते. Datsun दोन्ही इंजिनांना 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन सेटअप आहे. ड्रायव्हर डिस्प्ले, ब्लूटूथ ऑडिओ, हँड्सफ्री म्युझिक आणि कॉलिंग, एलईडी लाईट्स, एअरबॅग्ज आणि बरेच काही वैशिष्ट आहे.

लोकप्रिय शहरांतील डॅटसन रेडी-गो कारच्या किमती

Datsun Redi-Go New Car Prices in Popular Cities
 

टाटा टिगोर (Tata Tigor)

Tata Tigor
Image Source : www.carwale.com

टाटा टिगोर हे सर्वात परवडणारे मॉडेल आहे. दिसायला सुद्धा आकर्षक आहे. या कारची केबिनसुद्धा आरामदायक आणि प्रशस्त आहे.

लोकप्रिय शहरांमध्ये टाटा टिगोर नवीन कारच्या किमती

Tata Tigor New Car Prices in Popular Cities
 

मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (Maruti Suzuki Swift Dzire)

Maruti Suzuki Swift Dzire
Image Source : www.cardekho.com

डिझायरमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन बसवले आहे जे 113Nm टॉर्कसह 82Ps पॉवर जनरेट करते. 1.3L डिझेल इंजिनसाठी एक पर्याय देखील आहे जो 75Ps पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करतो. डिझायरचे मायलेज पेट्रोलसाठी 21.21 kmpl आणि डिझेल इंजिनसाठी 28.04 kmpl असे सेट केले जाते. डिझायरमध्ये आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर, मागील बाजूस पार्किंग सेन्सर, समोर ड्युअल एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट इत्यादि वैशिष्ट आहे.

लोकप्रिय शहरांमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर नवीन कारच्या किमती

Maruti Suzuki Swift Dzire New Car Prices in Popular Cities

या सर्व कार कमी बजेटमधील आहे. खरेदी करण्याआधी किमती तपासून घ्या, कारण कारच्या किमती बदलत राहतात.