• 28 Nov, 2022 17:14

Best Budget Car : 5 लाखांत मिळवा मुंबईत कार!

Best Low Budget Car

Image Source : www.marutisuzuki.com

Best Low Budget Car : आजच खरेदी करा तुमच्या स्वप्नातील ड्रीम कार, तीही अवघ्या 5 लाखांत. कसं? कुठे? आणि कोणती कार? हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Good quality car at cheap price in Mumbai : मुंबईत स्वस्तात कार खरेदी करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथे फक्त दर्जेदार कार परवडणाऱ्या किमतीत विकल्या जात नाहीत. तर त्यांच्या इन्व्हेंटरीमधील गाड्या पूर्णपणे नवीनही करून देतात. त्याचप्रमाणे तुम्हाला गाड्यांच्या बाबतीत हवी असलेली प्रत्येक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील ड्रीम कार विकत घेण्यासाठी CARS24 वेबसाईटला नक्की भेट द्या!

प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं की, आपल्याकडे किमान छोटी, पण स्वतःची गाडी असावी. पण आर्थिक परिस्थितीचा विचार करता, गाडी घेण्याचं बजेट नसल्याने आणि त्याचा ईएमआय या सर्व गोष्टींमुळे गाडी घेण्याचं स्वप्नं हे स्वप्नंच राहून जातं. त्यात नवीन गाडी घेतली की सरकार त्यावर भरमसाठ टॅक्स लावते. त्यामुळे नवीन कार खरेदी करताना होणारा खर्च कमी न होता अधिक वाढतो.

गाडींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सध्या गाडीच्या भावात 11 टक्के CRGA वाढला आहे. भविष्यात तो अधिकच ऊंची गाठणार असल्याचे सांगितले जाते. मग आता स्वत:ची गाडी घेणार तरी कशी? पण तुम्ही निराश होऊ नका. तुमचे स्वप्न आताही साकार होऊ शकते. कारण तुमच्यासाठी 5 लाखांपेक्षा कमी किमतीच्या 5 कंपनीच्या कार उपलब्ध आहेत. हा एक असा पर्याय आहे; जो तुमचे स्वप्नं पूर्ण करणार आहे. तुम्ही जर वापरलेली कार खरेदी करण्यास सहमत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली डील ठरू शकते. मुंबईत तुमच्या बजेटमध्ये परवडणारी आणि 5 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या गाड्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

मारुती सेलेरियो (Maruti Celerio)

Maruti Celerio
Image Source : www.marutisuzuki.com     

मारुती सेलेरियो VXI CNG, VXI CNG, VXI AMT, ZXI AMT, ZXI plus AMT, LXI, VXI, ZXI, ZXI plus  या 8 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही 5-सीटर हॅचबॅक आहे जी 998 CC पेट्रोल आणि CNG चा सुद्धा वापर करू शकता. 23.1 kmpl ते 31.79 kmpl मायलेज असलेली ही कार आहे. जी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेरिएंट आणि इंधन प्रकारावर चालते. 35 लिटर इंधन टाकीची क्षमता आहे. त्याची मुंबईत किंमत 6.18 लाखापासून सुरू होऊन 8.19 लाखांपर्यंत आहे. परंतु CARS24 वर तुम्ही सेलेरियोचे वर्ष, स्थिती आणि इतर अनेक गोष्टी बघून 5 लाखाच्या आत विकत घेऊ शकता. 

डॅटसन रेडी गो (Datsun Redi Go)

Datsun Redi Go
Image Source : www.datsun.co.in

निसानच्या मालकीची एक आरामदायक सिटी कार आहे. जी ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनच्या 6 पेट्रोल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही 22.0 किमीचे ARAI मायलेज देते आणि त्यात 222 लिटर बूट स्पेस आहे. हे सीटबेल्ट रिमाइंडर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, पॉवर स्टीयरिंग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, फॉग लाइट्स इत्यादी वैशिष्टपूर्ण आहे. मुंबईत त्याची ऑन-रोड किंमत 4.46 लाखांपासून सुरू होऊन 5.75 लाखांपर्यंत जाते. CARS24 वर डॅटसन रेडी गो 3 ते 4 लाखांमध्ये चांगल्या स्थितीत मिळू शकते.

रेनॉल्ट क्विड (Renault KWID)

Renault KWID
Image Source : www.carwale.com

ही कार मायक्रो-एसयूव्ही जी क्रॉसओवर सेगमेन्टमध्ये येते. क्विडचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 24.04 kmpl चे मायलेज देते तर मॅन्युअल ट्रांसमिशन 25.17 kmpl चे मायलेज देते. 2019 मध्ये रेनॉल्टने क्विडची फेसलिफ्ट सिरिज लाँच केली. ज्यामध्ये ऑप्शनल पॅसेंजर-साइड फ्रंट एअरबॅग, नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चाके आणि फ्रंट ग्रिल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश होता. त्याची मुंबईत ऑन-रोड किंमत 5.27 लाख आहे. तर CARS24 वर वापरलेल्या क्विडची किंमत फक्त 3 ते 4 लाखांच्या दरम्यान असेल.

मारुती डिझायर (Maruti Dzire)

Maruti Dzire
Image Source : www.marutisuzuki.com

मारुती डिझायर ही 5-सीटर सेडान आहे. जी 14 मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: AMT VDI, AMT VXI, AMT ZDI, AMT ZDI Plus, AMT ZXI, AMT ZXI Plus, LDI, LXI 1.2, VDI, VXI 1.2, ZDI, ZDI Plus, ZXI 1.2, ZXI प्लस ही मारुती स्विफ्टची प्रेरित हॅचबॅक सिरिज आहे जी भारतात 2008 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली होती.  इंधन प्रकाराच्या आधारावर, त्याचे मायलेज 28.40 kmpl आणि 22.00 kmpl दरम्यान आहे. ही मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे जी परवडणारी आहे आणि सर्वात स्वस्त कारच्या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. CARS24 सह, तुम्ही त्याच्या निर्मितीचे वर्ष, स्थिती आणि इतर अनेक घटकांच्या आधारावर 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत चांगल्या स्थितीतील कार घेऊ शकता.  

मारुती अल्टो (Maruti Alto)

Maruti Alto
Image Source : www.carandbike.com

भारतीय बाजारपेठेत सर्वात यशस्वीपणे चालणाऱ्या मॉडेलपैकी एक आहे. ही 5-सीटर कार आहे.  8 वेगवेगळ्या मॅन्युअल पेट्रोल आणि CNG प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: या कारचे मायलेज 19.7 ते 15.7 kmpl आहे. त्याची ऑन रोड किंमत 3.39 लाख ते 5.03 लाखांपर्यंत आहे आणि ती ग्रॅनाइट ग्रे, सेरुलियन ब्लू, रेड आणि मोजिटो ग्रीन या 4 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. CARS24 वर, तुमच्याकडे 2-3 लाखांच्या दरम्यान चांगल्या स्थितीतील अल्टो असू शकते.