Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning : रिटायरमेंटचे प्लॅनिंग करताय, जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी!

Retirement Planning

Retirement Planning : उतारवयातील आर्थिक ताणातून मुक्त होण्यासाठी गुंतवणूक व नियोजन आणि सेवानिवृत्ती निधीतून पैसे काढण्याचे नियोजन प्रभावी असणे गरजेचे आहे.

निवृत्तीमध्ये (Retirement) आर्थिक सुरक्षितता असतेच असे नाही. मग सुरक्षितता असावी असे वाटत असेल तर त्यासाठी नियोजन आणि निश्चय असावा लागतो. त्याचबरोबर आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे ‘पैसा’.  सेवानिवृत्ती हा जीवनाचा एक नवीन प्रवास आहे; जो तुम्हाला नवीन कॅलिडोस्कोपसह वेगळ्या टप्प्याचा अनुभव घेण्यास मदत करतो. ते किती सुरळीतपणे चालते हे तुम्ही नियोजनाचा टप्पा किती चांगल्याप्रकारे पार पाडता यावर अवलंबून आहे.

नियमित मासिक उत्पन्न नसल्यामुळे बचतीवर आणि गुंतवणुकीच्या परताव्यावर ताण येतो. या ताणातून मुक्त होण्यासाठी सेवानिवृत्तीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक तर निवृत्तीसाठी गुंतवणूक आणि नियोजन करणे खूपच गरजेचे आहे आणि दुसरा भाग म्हणजे सेवानिवृत्ती निधीतून पैसे काढण्याचे नियोजन हे ही तितकेच प्रभावी असणे गरजेचे आहे. नाहीतर सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या निधीचा योग्य वापर केला गेला नाही तर तो चुकीच्या पद्धतीने खर्च होण्याची शक्यता आहे. या प्रमुख घटकांसोबतच सेवानिवृत्तीचे नियोजन करता येईल असे काही महत्त्वाचे टप्पे आपण पाहणार आहोत. 

निवृत्ती नियोजन असे करा? (Do Retirement Planning?)

चलनवाढ विचारात घ्या (Understand the Inflation)

रिटायरमेंट प्लॅनिंग करताना चलनवाढीचा (Inflation) घटक विचारात घ्या. गुंतवणुकीचा प्रयत्न करणे आणि त्या गुंतवणुकीची उभारणी करणे महत्त्वाचे आहे. कारण महागाईचा सर्व गोष्टींवर दूरगामी परिणाम होत असतो. त्याचा परिणाम आर्थिक नियोजनावर मोठ्या प्रमाणात होतो. चलनवाढीमुळे तुमचा परतावा कमी होऊ शकतो म्हणून कोणतेही प्लॅनिंग करताना भविष्यातील दरवाढीचा अंदाज विचारात घेऊनच नियोजन करा.

बचत करणे ही सर्वोत्तम सवय आहे (Saving is the best habit)

सेवानिवृत्तीसाठी बचतीला प्राधान्य द्या. तुम्ही किती बचत करता हे महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या बचतीचे नियम तयार करा. त्यावर ठाम राहा आणि ठरवलेले ध्येय निश्चित करा. बचत कधीही सुरू करता येते आणि त्यात सातत्याने वाढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

लवकरात लवकर बचत सुरू करा (Start Early for Saving)

सेवानिवृत्तीसाठी किमान 30 व्या वर्षापासून गुंतवणूक आणि बचत करणे करणे केव्हाही चांगले ठरू शकते. तरूण वयात बचत सुरु केल्यावर निवृत्तीच्यावेळी तुम्हाला उतारवयातील खर्चाचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे तरूणांनी नोकरी सुरू झाल्यानंतर लगेच भविष्यासाठी गुंतवणूक सुरू करणे महत्त्वाचे आहे.

आरोग्य-विमा आणि विशिष्ट योजनांमध्ये गुंतवणूक करा (Invest in Health Insurance and Specific Plans)

उतारवयात आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. म्हणून, आणीबाणीच्यावेळी होणारा खर्च टाळण्यासाठी इन्शुरन्सच्या माध्यमातून उतारवयातील आर्थिक सुरक्षा मजबूत करा. शक्यतो कमी वयात इन्शुरन्स काढल्यास त्याचा उतारवयात फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्ही केलेली बचत आणि गुंतवणुकीतून मिळणारा परतावा याचा मेडिकल इमर्जन्सीमुळे तुमच्यावर ताण येणार नाही.

सेवानिवृत्तीच्या गरजा जाणून घ्या (Know your Retirement Needs)

सेवानिवृत्तीनंतर आपल्या आर्थिक गरजा नेमक्या काय आहेत ते आपणांस माहिती असणे गरजेचे आहे. त्यावर आधारित आपले आजचे नियोजन सूचिबद्ध करता येते. कारण सेवानिवृत्तीनंतर ज्या गोष्टींची गरज भासणार आहे. त्या गोष्टींची पूर्तता किंवा त्याचे नियोजन लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. 

गुंतवणुकीची माहिती घ्या (Know the Investment  Options)

तुम्ही पैसे किती जतन करत आहात  यावर गुंतवणुकीचे प्रकार महत्वाची भूमिका बजावतात.  गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती, तुमची बचत किंवा पेन्शन योजना आहे का? नसेल तर काढून घेणे. सेव्हिंग्ज एका ठिकाणी गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ती गुंतवा. गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी आणि परतावा अधिकाधिक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करणे, अशा अनेक घटकांचा अवलंब करून आर्थिक सुरक्षितता करता येऊ शकते.

सेवानिवृत्तीच्या बचतीला हात लावू नका (Don't touch your retirement savings)

सेवानिवृत्तीमधील बचत आताच काढली तर मुद्दल आणि व्याज याचे गणित फसू शकते. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. तसेच टॅक्स किंवा मुदतीपूर्वी पैसे काढल्यामुळे दंड ही भरावा लागू शकतो.

उत्पन्न वाढीसह गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा (Increase investment volume with income growth)

जीवनातील सुरुवातीच्या टप्प्यापासून सुरुवात करून, आवश्यकतेनुसार लाभांश देणारी गुंतवणूक निवडणे अत्यंत आवश्यक आहे. करिअरचा आलेख जसजसा पुढे सरकतो, तसा एक टप्पा येतो जेव्हा गुंतवणुकीचे प्रमाण वाढवता येते. कमाईमध्ये अशी कोणतीही वाढ होत असताना तुम्ही नेहमी अधिक गुंतवणूक केली पाहिजे.

खूप साऱ्या कंपन्या निवृत्त झाल्यानंतर अनेक विशेष आणि सर्वसमावेशक सेवानिवृत्ती योजना आणि पेन्शन योजना ऑफर करतात. ज्यामुळे तुमचे आर्थिक स्वातंत्र्य सुनिश्चित होण्यासाठी मदत होऊ शकते.