LIC Launches Whatsapp Services: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) त्यांच्या नोंदणीकृत एलआयसी (LIC) पॉलिसीधारकांसाठी निवडक इंटरॅक्टीव्ह व्हॉट्सअॅप सेवा (Interactive whatsapp services) सुरू केल्या आहेत. विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या LIC ने नुकतीच घोषणा केली की व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.
एलआयसी व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घ्या (Avail LIC WhatsApp service)
ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसी पोर्टलवर आपली पॉलिसी नोंदणी केली आहे त्यांनी व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून मोबाईल क्रमांक 8976862090 वर 'HI' पाठवावा, त्यानंतर ग्राहक 11 हून अधिक सेवांचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा ग्राहक व्हॉट्सअॅपवर 'HI' पाठवतो तेव्हा तो LIC च्या WhatsApp शी कनेक्ट होईल आणि स्क्रीनवर सेवांची यादी दिसेल. सूचीतील तुमच्या गरजेनुसार त्यावर क्लिक करून तुम्ही सेवेचा लाभ घेऊ शकाल.
व्हॉट्सअॅपवर देण्यात आलेल्या एलआयसी सेवांची यादी (List of LIC services offered on WhatsApp)
- प्रीमियम पेयेबल (Premium payable)
- बोनस माहिती (Bonus Information)
- पॉलिसी पोझिशन (Policy Position)
- लोन एलिजिबिलिटी कोटेशन (Loan Eligibility Quotation)
- लोन रिपेमेंट कोटेशन (Loan Repayment Quotation)
- लोन इंटरेस्ट ड्यू (Loan Interest Due)
- प्रीमियम पेमेंट सर्टिफिकेट (Premium payment certificate)
- युलिप - युनिट्सचा तपशील (ULIP – Details of Units)
- एलआयसी सर्व्हिस लिंक (LIC service Link)
- ऑप्ट इन/ ऑप्ट आऊट सर्व्हिसेस (Opt In/Opt Out Services)
- एन्ड द कन्व्हर्सेशन (End the conversation)
अशाप्रकारे एलआयसी पोर्टलवर पॉलिसीची नोंदणी करा (Register the policy on LIC portal like this)
- एलआयसीच्या व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी प्रथम एलआयसी पोर्टलवर पॉलिसीची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहकांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.
- सर्वप्रथम www.licindia.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'कस्टमर पोर्टल'वर क्लिक करा.
- यापूर्वी तुम्ही कस्टमर पोर्टलसाठी नोंदणी केली नसेल तर 'न्यू युजर'वर क्लिक करा.
- विचारल्याप्रमाणे खालील तपशील भरा.
- www.licindia.in भेट द्या, 'न्यू युजर' टॅबवर क्लिक करा, तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड निवडा आणि आवश्यक ती सर्व माहिती द्या. आपण आता नोंदणीकृत पोर्टल वापरकर्ता आहात.
- 'ई-सर्व्हिसेस' टॅबवर क्लिक करा आणि तुम्ही तयार केलेला युजर आयडी वापरून लॉग इन करा.
- त्यानंतर, दिलेला फॉर्म भरून ई-सेवा वापरण्यासाठी आपल्या पॉलिसींची नोंदणी करा.
- आता फॉर्म प्रिंट करून त्यावर सही करा. फॉर्मची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
- पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
- एलआयसी कार्यालयांकडून पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल आणि एसएमएस पाठवला जाईल. ज्यामध्ये असं लिहिलं जाईल की, आता तुम्ही आमच्या ई-सेवांचा फायदा घेण्यास तयार आहात.
- आता सबमिट बटणावर क्लिक करा.
- आपल्या आवडीचा युजर आयडी आणि पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.
- लॉगइन करून 'बेसिक सर्व्हिसेस'वर क्लिक करा त्यानंतर 'अॅड पॉलिसी'चा पर्याय निवडा.
- आता तुमच्या सर्व पॉलिसींची नोंदणी करा.