Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे

LIC

Image Source : www.twitter.com

जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांच्या न्यू जीवन शांती योजनेसाठी (प्लॅन क्र. 858) दर सुधारित केले आहेत. 5 जानेवारीपासून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नवीन पॉलिसीधारकांना आता वाढीव व्याज मिळणार आहे.

LIC ने नवीन जीवन शांती योजनेसाठी खरेदी किमतीसाठी (Purchase Price)  प्रोत्साहन रक्कम (Incentive Price) देखील वाढवली आहे. पॉलिसीधारक आता 3 रुपये ते 9.75 रुपये प्रति 1000 च्या खरेदी किंमतीवर लाभ घेऊ शकतात. तथापि, प्रोत्साहन रक्कम खरेदी किंमत आणि निवडलेल्या कालावधीवर (Deferment Period) अवलंबून असेल. भारतीय आयुर्विमा महामंडळाने 05.01.2023 पासून न्यू जीवन शांती (योजना क्रमांक 858)योजनेचे वार्षिक दर सुधारित केले आहेत.

LIC ची नवीन जीवन शांती योजना काय आहे?

LIC ची नवीन जीवन शांती योजना ही एकच प्रीमियम योजना आहे. पॉलिसीधारक सिंगल लाइफ आणि डिफरमेंट एन्युअल रेट यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात.न्यू जीवन शांती योजना नोकरदार आणि स्वयंरोजगार असणाऱ्या व्यावसायिकांसाठी एक चांगला पर्याय आहे ज्यांना निश्चित कालावधीनंतर भविष्यासाठी नियमित उत्पन्नाची तजवीज करायची आहे.

LIC2(2)

कोण गुंतवणूक करू शकतो?

ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसा पैसा आहे त्यांच्यासाठी एलआयसीचा हा प्लॅन चांगला पर्याय ठरू शकतो. न्यू जीवन शांती ही एक एन्यूटी योजना आहे. म्हणजे स्कीम घेतानाच तुम्ही तुमच्या पेन्शनची रक्कम निर्धारित करू शकता. ही योजना तरुणांसाठी अतिशय चांगली आहे. तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच निवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाची तजवीज करू शकतात.

दरमहा 11,192 रुपये मिळवा

तुम्ही LIC च्या न्यू जीवन शांती योजनेत किमान रु. 1.5 लाख गुंतवू शकता. या योजनेत पैसे गुंतवण्याची कमाल मर्यादा नाही. सदर योजनेनुसार, सिंगल लाइफ डिफर्ड एन्युइटीचा विचार करता 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करून तुम्ही 11,192 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. ज्वाइंटलाइफ डिफर्ड एन्युइटीच्या प्रकरणात, मासिक पेन्शन रु. 10,576 इतकी असू शकते. एन्युइटीची रक्कम प्रत्येक केसमध्ये बदलू शकते. याविषयी अधिक माहिती LIC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.