हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. LIC ने Adani Group मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे आता LIC ला याचे मोठे नुकसान होणार, अशा प्रकारचे वृत्त पसरले होते. LIC पूर्णत: कोसळून जाणार अशा प्रकारचे देखील वृत्त पसरले होते. यामुळे LIC गुंतवणूकदारांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते. या परिस्थितीत LIC ने महत्वपूर्ण असे हे निवेदन जारी केले आहे.
IRDAI च्या नियमांचे होते पालन
LIC ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेली रक्कम आजच्या बाजारमूल्याप्रमाणे 36 हजार 474.78 कोटी इतकी आहे. एकूण 0.975 टक्के म्हणजे 1 टक्क्यापेक्षाही कमी गुंतवणूक LIC ने अदानी समुहमध्ये केली आहे. सर्व विमा कंपन्याना गुंतवणूकीविषयी लागू असणाऱ्या IRDAI नियमांचे पालन करून ही गुंतवणूक केली असल्याचे LIC ने स्पष्ट केले आहे.हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून कमालीची घसरण पहायला मिळत आहे. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अदानी समुहाचे शेअर्स गडगडल्यामुळे ज्या गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झाले त्यात सरकारी कंपनी एलआयसीचा देखील समावेश आहे. पहिल्या दोन दिवसात एलआयसीला तब्बल 16 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यामुळे प्रत्यक्ष अदानींच्या कंपन्यांमध्ये नाही तरी LIC मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते .
सामान्यत: एलआयसी एखाद्या औद्योगिक समूहातील आपल्या गुंतवणूकीविषयी तपशील जाहीर करत नाही. पण हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यानंतर अदानी ग्रुपमध्ये असणाऱ्या मोठमोठ्या इन्व्हेस्टरचे तपशील बाहेर येऊ लागले. त्यानंतर एलआयसी संकटात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर हे डिटेल जाहीर करत असल्याचे LIC ने स्पष्ट केले आहे. इक्विटी आणि डेट असे अदानी समूहातील कंपन्यामध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच , एलआयसीकडे असलेल्या कंपनीच्या डेट सिकयूरिटीजचे क्रेडिट रेटिंग AA असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.